ETV Bharat / bharat

माकडाच्या हल्ल्यात इमारतीवरुन पडल्यानं महिलेचा मृत्यू, छतावर कपडे वाळत घालणं उठलं जिवावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 2:37 PM IST

Monkey Kills Woman in Agra : छतावर कपडे वाळवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर माकडानं उडी मारली. या घटनेत महिला दुमजली इमारतीवरुन खाली कोसळल्यानं महिलेचा मृत्यू झाला.

Monkey Turns Killer in Agra
संपादित छायाचित्र

आग्रा Monkey Turns Killer in Agra : कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या छतावर गेलेल्या महिलेच्या अंगावर माकडानं उडी मारली. या घटनेत छतावरुन पडून डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना आग्रा शहरातील उत्तर विभागातील भैंरो बाजार इथं घडली. चंद्रावती उर्फ चंदा महेंद्र सिंह असं छतावरुन पडून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

माकडानं अंगावर उडी मारल्यानं महिला छतावरुन पडली खाली : चंदा या आपल्या दुमजली इमारतीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बाजूच्या इमारतीवरुन माकडांचा एक कळप त्यांच्या इमारतीकडं येत होता. यावेळी चंदा यांनी माकडांना पाहून आरडाओरड केली. मात्र माकडांच्या कळपानं त्यांच्या इमारतीकडं कूच केली. यातील एका माकडानं चंदा यांच्या अंगावर उडी मारल्यानं चंदा तोल जाऊन इमारतीवरुन खाली कोसळल्या.

डोक्याला मार लागून चंदाचा मृत्यू : माकडानं अंगावर उडी मारल्यानंतर चंदा दुमजली इमारतीवरुन खाली कोसळल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. रक्तबंबाळ अवस्थेत चंदाला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. महेंद्र सिंह यांचं घर आग्रा उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार पुरुषोत्तम खंडेलवाल यांच्या घराशेजारी आहे. मात्र या परिसरात माकडांनी मोठा उच्छाद मांडल्याची माहिती नागरिकांनी दिली.

चार मुलींच्या डोक्यावरील आईचं छत्र हरवलं : माकडाच्या हल्ल्यात चंदा यांचा मृत्यू झाल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. चंदा महेंद्र सिंह यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. शहरातील भैंरो बाजार इथं घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये मोठा संताप पसरला आहे. याबाबत माजी नगरसेवक मनोज सोनी यांनी "माकडं पकडण्याकडं मनपाचं दुर्लक्ष होत आहे. माकडांच्या हल्ल्यात यापूर्वीही काही महिलांचा मृत्यू झाला आहे. माकडांच्या हल्ल्यामुळं जुन्या शहरातील नागरिक दहशतीत आहेत. बेलगंज, भैरों बाजार, रावतपाडा, दरेसी, छत्ता, मोतीगंज, हॉस्पिटल रोड, मोती कटरा, नूरी गेट, किनारी बाजार, यमुना किनारा रोड या परिसरात माकडांचा उच्छाद आहे. त्यामुळं नागरिकांनी घरोघरी जाळ्या लावल्या आहेत."

आतापर्यंत केली 6895 माकडांची नसबंदी : आग्रा महानगरपालिकेनं माकडांना पकडण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर आग्रा महापालिकेच्या सभागृहात माकडांच्या प्रश्नांवरुन बराच मोठा गदारोळ झाला आहे. महापालिकेच्या नगरसेवक रवी माथूर म्हणाले, "आग्रा महापालिकेत माकडांविरोधात मोहीम राबवण्याची अनेकदा मागणी केली आहे. माकडांच्या हल्ल्यात शहरात अनेक मृत्यू झाले आहेत. महापालिकेच्या मोहिमेत आतापर्यंत 13 हजार 181 माकडं पकडण्यात आली. तर 6 हजार 895 माकडांची नसबंदी करण्यात आली आहे."

माकडांच्या हल्ल्यात झालेले मृत्यू :

  • 2018 मध्ये रुनकता इथं एका माकडानं आईच्या मांडीवरचं मूल हिसकावून पळ काढला. यात मुलाचा मृत्यू झाला होता.
  • 2019 मध्ये माईथान इथल्या हरिशंकर गोयल यांचाही माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला
  • 2020 मध्ये माकडांच्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला.
  • 2022 मध्ये माकडांच्या हल्ल्यात चार नागरिकांचा बळी गेला.

हेही वाचा :

  1. रामलल्लाच्या दर्शनासाठी स्वत: हनुमानजी आले! प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी राम मंदिरात काय घडलं?
  2. Terror of Monkeys In Banda : माकडाने झोपलेल्या बाळाला दिले छतावरून फेकून; बाळाचा मृत्यू
  3. Monkey Hanged Electric Wire : पिलासह माकडीणीचा विजेच्या तारेवर थरारक संघर्ष, संधी मिळताच केली मृत्यूच्या दाढेतून सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.