ETV Bharat / bharat

Mission Divyastra : अग्नी-5 क्षेपणास्राची यशस्वी चाचणी; पंतप्रधानांकडून DRDO चं कौतुक, चीन-पाकिस्तानची झोप उडणार - Agni 5 Missile First Flight Test

Mission Divyastra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना ‘मिशन दिव्यस्र’ यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “DRDO शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच अभिनंदन केलंय. ‘डीआरडीओ’नं ‘मिशन दिव्यस्त्र’ची यशस्वी चाचणी केलीय.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 7:45 PM IST

Updated : Mar 11, 2024, 10:03 PM IST

नवी दिल्ली Mission Divyastra : ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांच्या नव्या यशस्वी चाचणीबद्दल सोमवारी (दि. 11 मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डीआरडीओ’नं ‘मिशन दिव्यस्त्र’ची यशस्वी चाचणी केली आहे. DRDO शास्त्रज्ञांनी मिशन दिव्यस्त्र या नावानं स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केलीय.

'डीआरडीओ'चं मिशन यशस्वी : पंतप्रधानांनी आपल्या ‘एक्स’वर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “मिशन दिव्यस्त्राची यशस्वी चाचणी झाली. आमच्या DRDO शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे. ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल’ तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पहिली उड्डाण चाचणी : ‘मिशन दिव्यस्र’ अंतर्गत अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झालीय. या क्षेपणास्रामध्ये ‘मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल’ (MIRV) तंत्रज्ञान आहे. अचूक लक्ष्य भेदण्यासाठी याचा वापर होणार आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं मिशन दिव्यस्त्र यशस्वीरित्या पार पडलं आहे. डीआरडीओकडून मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) नं सुसज्ज स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी पार पडली.

संरक्षण क्षमतेत वाढ : भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र क्षमतांना पुढं नेण्यासाठी मिशन दिव्यास्त्राचं महत्त्व अधोरेखित करून DRDO शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या तांत्रिक पराक्रमाबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिमान व्यक्त केलाय. ‘MIRV’ तंत्रज्ञानासह अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी देशाच्या संरक्षण सज्जता आणि सामरिक क्षमतांना बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारताची बळकटी : अलिकडच्या काळात भारत स्वदेशीवर अधिक भर देत आहे. स्वदेशी बनावटीची अनेक क्षेपणास्र भारतीय सैन्य दलात (Indian Army) तैनात आहेत. डीआरडीओ म्हणजे भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून स्वदेशी बनावटीची शस्रास्रे विकसित करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय बनावटीची ही शस्रास्रे भविष्यात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतील.

अग्नी 5 मिसाईल काय आहे? : अग्नी 5 हे भारताचं ‘इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल’ (ICBM) आहे. याची निर्मिती ‘डीआरडीओ’नं (DRDO) केली आहे. अग्नी 5 ची यशस्वी चाचणी ही भारताच्या सैन्याला बळ देणारी तसंच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणारी आहे.

हेही वाचा :

1 CAA Implementation : देशभरात आता CAA लागू होणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

2 पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल

3 भाजपा खासदार अनंतकुमार हेगडेंच्या 'त्या' विधानावरून कर्नाटकात रणकंदन

Last Updated : Mar 11, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.