शिमला Minor Girl Raped By Friend : सोशल माध्यमावर ओळख झालेल्या मित्रानं बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नराधमानं बालिकेवर बलात्कार करुन त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवून बालिकेच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी बालिकेच्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शिमला जिल्ह्यातील रामपूर इथल्या नानखडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. विशेष म्हणजे या अगोदर 11 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची घटना अद्याप ताजी असताना आता बालिकेवर नराधमानं बलात्कार केल्यानं शिमल्यात खळबळ उडाली.
सोशल माध्यमांवर झाली नराधमाशी ओळख : चार वर्षांपूर्वी या पीडितेची नराधमासोबत सोशल माध्यमावर मैत्री झाली. सोशल माध्यमावर झालेल्या ओळखीतून दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. दोघांनी मोबाईलवर बराच काळ संवाद केला. जून 2023 मध्ये नराधमानं त्याला शिमला इथल्या थिओग इथं भेटण्यासाठी बोलावलं. यानंतर नराधमानं तिला थिओगच्या पुढं असलेल्या हॉटेलमध्ये नेलं. या हॉटेलमध्ये नराधणानं बालिकेवर बलात्कार केला. यानंतर नानखडी इथल्या राहत्या घरीही त्यानं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. 15 जून 2023 रोजी नराधमानं तिला भेटण्यासाठी बोलावलं. इथून आरोपीनं तिला आपल्या घरी नेलं. यावेळी त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला, असा आरोप पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल : नराधमानं व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला पैशांची मागणी केली. त्यामुळे वातागून पीडितेन त्याला भेटण्यास नकार दिला. यानंतर नराधमानं पीडितेचा अश्लिल व्हिडिओ पीडितेच्या वडिलांच्या नंबरला पाठवला. यावेळी त्यानं पीडितेच्या वडिलांना ब्लॅकमेल करत हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला. मात्र या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलं नसल्याची माहिती शिमला पोलीस अधीक्षक संजीव गांधी यांनी दिली.
हेही वाचा :
- बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide
- सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane
- बलात्काराच्या गुन्ह्यात नेहमी पुरुषच दोषी नसतो; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, आरोपीला केलं दोषमुक्त - Men Are Not Always At Fault