आग्रा Merchant Navy officer Dies In China : मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचं चीनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्यानं खळबळ उडाली. ही घटना 14 दिवसांपूर्वी घडली असून अनिल कुमार असं निधन झालेल्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्यांचं नाव आहे. या अधिकाऱ्याची वृद्ध आई, पत्नी आणि मुलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांनी बुधवारी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडं पीडित कुटुंबाला मदतीचं आवाहन केलं. अनिल कुमार यांचं पार्थिव भारतात परत आणण्याची त्यांनी मागणी केली. त्यामुळे अनिल कुमार यांचं पार्थिव लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.
छातीत दुखल्यानंतर झालं निधन : दिल्लीतील चाणक्य पुरी इथल्या साई धाम रेसिडेन्सीत राहणारे अनिल कुमार (49) हे मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता होते. तर त्यांची पत्नी अंजुलता या शिक्षिका आहेत. "अनिल कुमार एमव्हीजीएच नाइटिंगेलमध्ये मुख्य अभियंता होते. त्यांचं जहाज चीनच्या झेजियांग प्रांतातील झौशान शहरात ड्रायडॉकिंगसाठी गेलं होतं. 11 जूनच्या रात्री उशिरा अनिल कुमार यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना झौशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्रभर उपचारानंतर पती अनिल कुमार यांना सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. पण, त्याच दिवशी दुपारी अनिल कुमार यांच्या छातीत त्रास होऊ लागल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान अनिल कुमार यांचा मृत्यू झाला," अशी माहिती त्यांच्या पत्नी अंजुलता यांनी दिली.
अनिल कुमार यांची पत्नी, आई बेहाल : अनिल कुमार यांचा चीनमध्ये मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अनिल कुमार यांची पत्नी अंजुलता, सासू रामकिशोर श्रीवास्तव आणि दोन मुलं रडून-रडून बेहाल झाले आहेत. अनिल कुमार यांच्या पत्नी अंजुलता यांनी सांगितलं की, "मी माझ्या पतीची कंपनी, भारतीय दूतावास आणि इतर अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधत आहे. माझ्या पतीचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवावं, अशी मी सर्वांना विनंती करत आहे. मात्र अद्यापही कोणती मदत करण्यात आली नाही." चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय नम्रता उपाध्याय यांनीही चीनचे अधिकारी आणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यांनीही प्रयत्न केले आहेत. 14 दिवस उलटून गेले तरी, अद्यापही त्यांना ठोस उत्तर मिळत नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रा एस पी सिंह बघेल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यातील संभाषणामुळे आशा निर्माण झाल्या आहेत.
परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं मदतीचं आश्वासन : केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांनी सांगितलं की, "मर्चंट नेव्ही अधिकारी अनिल कुमार यांच्या पत्नीनं ट्विटद्वारे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांकडं मदत मागितली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोललो. मी अधिकारी अनिल कुमार यांची संपूर्ण माहिती परराष्ट्र मंत्र्यांना दिली. आग्र्याचे अभियंता अनिल कुमार यांचं पार्थिव लवकर भारतात आणण्याची विनंती करण्यात आली. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे."
हेही वाचा :
- Red Sea Crisis : भारतीय नौदलाच्या कारवाईमुळं समुद्री डाकू हादरले, भारतीय नौदलाचं जगभरातून कौतुक - Red Sea Crisis
- कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय नौदलानं घडवलं माणुसकीचं दर्शन - Indian Navy Rescues Pakistanis
- मोदी सरकारची मुत्सद्देगिरी यशस्वी, कतारच्या ताब्यातील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका