ETV Bharat / bharat

सागर मोहिमेसाठी भारत सज्ज; 'MATSYA 6000' मिशनची लवकरच होणार चाचणी

MATSYA 6000 : 'चांद्रयान-३' आणि 'आदित्य एल-१" या मोहिमा यशस्वी केल्यानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झालाय. इस्रोनं अंतराळाचा वेध घेतल्यानंतर भारत आता समुद्राचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 10:53 AM IST

सागर मोहिमेसाठी भारत सज्ज

चेन्नई (तामिळनाडू) MATSYA 6000 : भारत हा महासागर संशोधनात नवीन मैलाचा दगड गाठण्यासाठी सज्ज झालाय. चेन्नईस्थित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी' (NIOT) लवकरच प्रतिष्ठित 'समुद्रयान मिशन'अंतर्गत समुद्र संशोधन वाहन अर्थात 'MATSYA 6000' मिशनची हार्बर चाचणी घेणार आहे. 'एनआयओटी'चे संचालक जी ए रामदास यांनी याबाबत 'ईटीव्ही भारत'ला खास माहिती दिली.

'समुद्रयान मिशन' अंतिम टप्प्यात : खोल समुद्रात जाऊन संशोधनासाठी मानव पाठवण्याची तयारी सध्या भारतात सुरूय. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी' सध्या 'समुद्रयान मिशन'वर काम करत आहे. या प्रकल्पातंर्गत संशोधनाचा भाग म्हणून मानवांना खोल समुद्रात पाठवण्यात येणार आहे.

MATSYA 6000 ची होणार चाचणी : चेन्नईस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या स्वायत्त संस्थेने खोल समुद्रातील संशोधनासाठी 'MATSYA 6000' नावाचे वाहन विकसित केलंय. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना 'एनआयओटी'चे संचालक जी ए रामदास म्हणाले की, "समुद्रयान प्रकल्प हा 4 हजार 800 कोटी रुपये खर्चून राबवण्यात येत आहे. त्यासाठी सर्व तयारी सुरुय. 'मत्स्य 6000' मिशनच्या हार्बरची चाचणी चेन्नई येथे काही आठवड्यात होणार आहे."

काय आहे 'समुद्रयान मिशन' : जी ए रामदास 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना म्हणाले की, "समुद्राखाली 6,000 मीटर खोलीवर संशोधन करण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. तसंच हार्बर चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 500 मीटर खोलीवर जाऊन संशोधन केलं जाणार आहे. या चाचणीसाठी तीन संशोधक समुद्राच्या खोलवर जाऊन पृष्ठभागावरील खनिज संसाधनांचा अभ्यास करणार आहेत. शास्त्रज्ञांना प्रवास करता यावा यासाठी वाहनाचा आकार गोलाच्या आकाराचा बनवलाय. सुमारे 6.6 मीटर लांब आणि 210 टन वजनाचे हे वाहन सतत 48 तास पाण्याखाली संशोधन करण्यास सक्षम आहे."

हेही वाचा -

  1. इस्रोनं रचला इतिहास ! अंतराळात पाठविला 'नॉटी बॉय'; वाचा सविस्तर काय आहे मिशन?
  2. इस्रोची सौर मोहीम फत्ते! आदित्य अंतराळयान L1 बिंदूवर दाखल, जगाला होणार फायदा
  3. गुप्तचर माहितीसाठी 50 उपग्रह प्रक्षेपित करणार; एस सोमनाथांनी स्पष्टच सांगितलं इस्रोचं प्लॅनिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.