बंगळुरू- मार्गदर्शी चिट फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी दीप प्रज्वलित करून चिक्कबल्लापूर येथे कंपनीच्या 115 व्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी मार्गदर्शी चिट फंडच्या शैलजा किरण यांनी चिक्कबल्लापूर क्षेत्राच्या प्रगती आणि विकासासाठी योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. शैलजा किरण यांनी ग्राहकांना चिटफंडची पहिली पावती दिली.
मार्गदर्शी चिट फंडाच्या विकासाची घोडदौड सुरूच आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी 115 व्या शाखेचे चिक्कबल्लापूर येथे उद्घाटन केलं. त्यामुळे कर्नाटकमध्ये मार्गदर्शीची कर्नाटक राज्यातील 24 वी शाखा सुरू झालीय. यावेळी कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी मागदर्शी चिट फंडबाबत सकारात्मक अभिप्राय दिलेत. ग्राहकांना बँकांच्या तुलनेत मार्गदर्शीच्या सेवा अधिक सुलभ वाटतात. मार्गदर्शीमधील पैसे काढताना कोणतीही अडचण येत नाही. मार्गदर्शीकडून वर्षानुवर्षे अत्यावश्यक आर्थिक सहाय्य दिलंय, हे लक्षात घेऊन ग्राहकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
मार्गदर्शीनं मोलाचं योगदान दिलं- शैलजा किरण यांनी म्हटले "आम्ही चिक्कबल्लापूर येथे मार्गदर्शी चिट फंडची 115 वी शाखा उघडल्यानं आनंदी आहोत. या राज्याची प्रगतीत योगदान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मार्गदर्शीने अलीकडेच 1 ऑक्टोबर रोजी सेवेची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. मार्गदर्शीनं ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून मार्गदर्शीनं मोलाचं योगदान दिलं आहे. घराचे बांधकाम असो मुलांचे लग्न असो किंवा शैक्षणिक खर्च असो, यासाठी मार्गदर्शी एक विश्वासार्ह गुंतवणूक आहे."
हेही वाचा-