भोपाळ MP Accident : भरधाव पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 14 नागरिकांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना डिंडोरीतील बडझार घाटात घडली आहे. या अपघातात 20 नागरिक जखमी झाले आहेत. या जखमींवर शाहपुरा कम्युनिटी हेल्थ सेंट्ररमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी दिली आहे.
भरधाव पीकअपवरील चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात : डिंडोरी इथल्या बडझार घाटात भरधाव पिकअपच्या चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर पिकअपमधील 20 इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. या प्रवाशांना शाहपुरा इथल्या कम्युनिटी हेल्थ सेंट्ररमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपरचार सुरू असल्याची माहिती डिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त : अपघाताची घटना समजताच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रकरणी शोक व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची तत्काळ मदतीची घोषणा केली. तर जखमींच्या प्रकृतीचीही त्यांनी विचारपूस केली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कॅबिनेट मंत्री संपतिया उईके यांना डिंडोरी इथं तत्काळ पोहोचण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर : दिंडोरी येथे झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेवर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्री म्हणाले, "या घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसंच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कॅबिनेट मंत्री संपतिया उईके डिंडोरी येथे गेले आहेत. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन अपघातग्रस्तांची माहिती घेतली आहे.
हेही वाचा :