ETV Bharat / bharat

मदर्स डेनिमित्त जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्व - MOTHERS DAY 2024 - MOTHERS DAY 2024

Mothers Day 2024 : आज 12 मे रोजी 'मदर्स डे' साजरा केला जात आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. हा दिवस सर्व आई आणि मुलांसाठी विशेष मानला जातो.

Mothers Day 2024
मदर्स डे (मदर्स डे 2024(IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 3:54 PM IST

मुंबई - Mothers Day 2024 : भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच 12 तारखेला 'मदर्स डे' साजरा केला जातो. आईबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. आई फक्त मुलाला जन्म देत नाही तर त्याचे पालनपोषणही करते आणि आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खात आपल्या मुलाच्या पाठीशी उभी राहते. आईशी नातं जन्मापूर्वीच तयार होत असतं. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. दरम्यान 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात अमेरिकन महिला ॲना जार्विस यांनी केली होती. यानंतर 'मदर्स डे' साजरा करण्याची औपचारिक सुरुवात 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी केली.

'मदर्स डे'चा इतिहास : अमेरिकन संसदेत कायदा करून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला. 'मदर्स डे'ची सुरुवात ॲना जार्विस यांनी केली असून तिला तिची आई खूप आवडत होती. ॲना आईबरोबर राहत असल्यानं तिनं कधीही लग्न केलं नाही. आईच्या निधनानंतर ॲनानं आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 'मदर्स डे' साजरा करण्यास सुरुवात केली. युरोपमध्ये या दिवसाला 'मदरिंग संडे' म्हणतात, तर ख्रिश्चन समुदायातील अनेक लोक या दिवसाला व्हर्जिन मेरीच्या नावानं संबोधतात. तर अमेरिका, भारत आणि कॅनडामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

सर्व मातांचं अमूल्य योगदान : मातृत्वाचे कर्तव्य पार पाडताना अनेकवेळा स्त्री आपले अस्तित्व विसरते. आपल्या आवडी-निवडी विसरून ती मुलाची काळजी घेण्यात आणि त्याचा लाड करण्यात व्यग्र असते. त्यामुळे आपला आईचा हा दिवस विशेष करण्यासाठी तुम्ही सुंदर भेट देऊन, तिला आनंदी करू शकता. हा दिवशी प्रत्येक आई आणि मुलासाठी खास आहे. 'मदर्स डे' हा समाजामधील सर्व मातांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्याचा प्रसंग आहे. मुलांचे जीवन घडवण्यात, चांगले मूल्ये रुजवण्यात, विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका आई बजावते. त्यांचे निस्वार्थ प्रेम कौटुंबिक जीवनाचा आधारस्तंभ म्हणून काम करते.

हेही वाचा :

  1. महाराणा प्रताप जयंतीच्या दोन तारखा का आहेत, जाणून घ्या मेवाडच्या शूर योद्ध्याबाबतची रंजक कहाणी - Maharana Pratap Jayanti 2024
  2. हसण्याचे आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जगभरात आज होतोय 'हास्य दिन' साजरा - World Laughter Day 2024
  3. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2024 : सांस्कृतिक चळवळीला चालना देणारा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्व - International Dance Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.