हैदराबाद : Mahatma Gandhi Death Anniversary : महात्वा गांधी हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते. त्यांनी सुमारे दोन दशकांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून भारताला मुक्त केलं. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्व क्षमतेमुळे त्यांना 'महात्मा' ही उपाधी मिळाली. 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूनं हत्या केली. 31 जानेवारीला राजघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 15 ते 16 लाख लोक होते.
निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती : आज 'गांधी स्मृती भवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिर्ला भवनात प्रार्थना स्थळाकडे जाणाऱ्या महात्मा गांधींवर गोडसेने संध्याकाळी 5.10 मिनिटांनी गोळी झाडली. त्यानंतर गोडसेंना अटक झाली. मात्र, या कटातील आपटे आणि करकरे दिल्लीतून पसार झाले. दरम्यान, बापूंच्या हत्येच्या 17 वर्षांनंतर 22 मार्च 1965 रोजी या हत्येच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांची नियुक्ती करण्यात आली.
-
हम सबके भीतर, समाज के भीतर गांधी और गोडसे रहते हैं।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 30, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
गोडसे रोज़ गांधी को मारने की कोशिश करता है।
गांधी रोज़ एक विचार बन कर ज़िंदा हो जाता है।
तुम कितने गांधी मारोगे?
हर मन में गांधी निकलेगा। #MahatmaGandhi pic.twitter.com/cchxKOjsgS
">हम सबके भीतर, समाज के भीतर गांधी और गोडसे रहते हैं।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 30, 2024
गोडसे रोज़ गांधी को मारने की कोशिश करता है।
गांधी रोज़ एक विचार बन कर ज़िंदा हो जाता है।
तुम कितने गांधी मारोगे?
हर मन में गांधी निकलेगा। #MahatmaGandhi pic.twitter.com/cchxKOjsgSहम सबके भीतर, समाज के भीतर गांधी और गोडसे रहते हैं।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 30, 2024
गोडसे रोज़ गांधी को मारने की कोशिश करता है।
गांधी रोज़ एक विचार बन कर ज़िंदा हो जाता है।
तुम कितने गांधी मारोगे?
हर मन में गांधी निकलेगा। #MahatmaGandhi pic.twitter.com/cchxKOjsgS
समाजसेवेसाठी पूर्ण समर्पण : गांधीजींचं आयुष्य म्हणजे सामान्य माणसानं स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे. आत्मभान, जगाविषयीची डोळस दृष्टी, मानवी मूल्यांवरील अपार श्रद्धा, दुसऱ्याच्या व्यक्तित्वाचा आणि विचारांचा आदर करण्याची नम्र वृत्ती हे महात्मा गांधींमध्ये गुण होते. पारदर्शी व्यवहार, स्वत:चा सतत घेतला जाणारा शोध, त्याप्रमाणे गवसलेल्या नव्या सत्याच्या आधारे स्वत:च्या विचारांत आणि कृतीत बदल घडवून आणण्याची तयारी, समाजसेवेसाठी पूर्ण समर्पण हे गुण त्यांना मोहनदासांकडून महात्मापदाकडे घेऊन गेले.
महात्मा गांधी एक ओळख :
- 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेल्या गांधींना भारतातच नव्हे तर जगात सत्य आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.
- भारतात महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.
- गांधीजी फक्त शाकाहारी जेवणच खात असत.
- महात्मा गांधींनी अहिंसा हा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग असल्याचं ठामपणे मानलं आणि लोकांना सत्याग्रहाच्या संकल्पनेची ओळख करून दिली.
- गांधीजींनी सत्याग्रहातील त्यांच्या सहकाऱ्यांसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये 1100 एकर जागेवर टॉल्स्टॉय फार्म ही छोटी वसाहत स्थापन केली.
- देशातील अस्पृश्यता दूर करण्याचं कामही त्यांनी केलं. 1932 मध्ये त्यांनी अस्पृश्यांचं जीवन सुधारण्यासाठी एक मोहीम सुरू केली.
- गांधीजी हे प्रसिद्ध लेखक लिओ टॉल्स्टॉय एकमेकांशी पत्राद्वारे संवाद साधत असत.
- महात्मा गांधींनी भारतातील हातमाग उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं, विशेषतः खादीवर लक्ष केंद्रित केलं.
- 1930 मध्ये त्यांना टाईम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आलं.
- गांधी स्मृती संग्रहालयाची स्थापना 1959 मध्ये झाली. हे भारतातील तामिळनाडूमधील मदुराई शहरात आहे.
- हे गांधी संग्रहालय म्हणूनही ओळखलं जातं. त्यामध्ये रक्ताने माखलेले कापडे आहेत. नथुराम गोडसेने मारले तेव्हा महात्मा गांधींनी ते कपडे घातलेले होते.
हेहा वाचा :
1 "...तर लवकरच देशात हुकूमशाही येईल", मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना उद्देशून मोठा इशारा
2 पुण्यतिथी, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जग जिंकणारे 'बापू'