ETV Bharat / bharat

काकांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन : पुतण्या अजित पवार, सून सुनेत्रा पवार लवाजम्यांसह पोहोचले शरद पवारांच्या घरी - SHARAD PAWAR BIRTHDAY

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुतणे अजित पवार, सून सुनेत्रा पवार, प्रफुल पटेलांनी हजेरी लावली.

SHARAD PAWAR BIRTHDAY
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2024, 10:42 AM IST

नवी दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज वाढदिवस असून संसदेचं हिवाळी अदिवेशन सुरू असल्यानं ते दिल्लीत आहेत. मात्र काकांचा वाढदिवस असल्यानं पुतण्या अजित पवार, सून सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आदींनी शरद पवार यांच्या घरी धाव घेतली. अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह शुभेच्छा देण्यासाठी धाव घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसाला पुतण्या अजित पवारांची हजेरी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन पुतण्या अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर काका पुतण्यांमध्ये वितुष्ठ आलं. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे समोरासमोर येण्याचं टाळत आहेत. पवार कुटुंबीयांची दिवाळीही यावर्षी वेगळी साजरी करण्यात आली. असं असताना शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुतण्या अजित पवार यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हजेरी लावली. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव जाला. मात्र प्रचारात शरद पवार यांनी सून ही बाहेरुन आलेली असते, अशा आशयाचं विधान केल्यानं ते चांगलंच चर्चेत होतं.

हेही वाचा :

  1. घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश
  2. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट आव्हाड यांनी केली, धनंजय मुंडे यांचा आरोप
  3. Politics over Pawar Meeting : 'गुप्त' भेटीत शरद पवारांना मंत्रीपदाची ऑफर? आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.