ETV Bharat / bharat

अमरावतीच्या व्यावसायिकाची वाराणसीत आत्महत्या; देवदर्शनाला गेले अन् संपवलं जीवन - Businessman Commits Suicide

Businessman Commits Suicide : अमरावतीच्या कौंडण्यपूर इथल्या व्यावसायिकानं वाराणसीतील एका गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केली. देवेश्वर गोविंद दास असं या व्यावसायिकाचं नाव आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 10:53 AM IST

Businessman Commits Suicide
संग्रहित छायाचित्र

लखनऊ Businessman Commits Suicide : महाराष्ट्रातील एका व्यावसायिकांनं वाराणसीतील गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. देवेश्वर गोविंद दास असं या आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. हा व्यावसायिक अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर इथचा असल्याची माहिती पुढं आली आहे. ही घटना वाराणसीतील महमूदगंज परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी गेस्टच हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी फोन केल्यानंतर व्यावसायिकानं फोन न घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली. व्यवस्थापकानं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो उघडला नाही. त्यानंतर पोलिसांना पाचारण केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

महाराष्ट्राच्या व्यावसायिकाची वाराणसीत आत्महत्या : देवेश्वर गोविंद दास हे व्यावसायिक वाराणसीतील महमूदगंज परिसरात असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा त्यांनी दरवाजा न उघडल्यानं याबाबतची माहिती कर्मचाऱ्यानं गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकांना दिली. यावेळी व्यवस्थापकानं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आतून कोणताच प्रतिसाद न आल्यानं पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी दरवाजा उघडला असता, आतमध्ये देवेश्वर गोविंद दास यांनी आत्महत्या केल्याचं आढळून आलं. त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

देवदर्शनासाठी आले होते देवेश्वर गोविंद दास : कौंडण्यपूर इथले व्यावसायिक देवेश्वर दास हे वाराणसीत देवदर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी महमूदगंज परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये खोली घेतली होती. शुक्रवारी रात्री देवेश्वर हे जेवण करुन खोलीत गेले होते. मात्र त्यानंतर गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन केले, मात्र तिकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. यावेळी गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यानं व्यवस्थापकाला कळवले. व्यवस्थापकांनी पोलिसांना फोन केल्यानं आम्हा तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. आम्ही गेस्ट हाऊसच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवला असता, देवेश्वर गोविंद दास यांचा मृतदेह आढळून आला. आधारकार्डवरुन मृताची ओळख पटली आहे. पोलीस फोनमधील कॉल डिटेल्सचा शोध घेऊन तपास करत आहेत, अशी माहिती भेलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शुक्ला यांनी दिली.

हेही वाचा :

  1. सर्व नेते गुंतले लोकसभेच्या मैदानात! शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र आत्महत्या; वाचा 'ईटीव्ही'चा खास रिपोर्ट - Farmers Suicide in Maharashtra
  2. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या - Pune Crime
  3. सांगलीतील व्यावसायिकाची छत्तीसगडमधील भिलाईत आत्महत्या - Sangli Businessman Suicide

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.