ETV Bharat / bharat

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधकांनी राजकारण करु नये - देवेंद्र फडणवीस - breaking news today - BREAKING NEWS TODAY

Maharashtra Breaking news live updates
Maharashtra Breaking news live updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 7:53 AM IST

Updated : Jun 25, 2024, 4:59 PM IST

Maharashtra Breaking News Live Updates : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

4:58 PM, 25 Jun 2024 (IST)

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधकांनी राजकारण करु नये - फडणवीस

पुण्याच्या प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये. राज्य सरकारने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. जर यामध्ये राजकारण करायचं झालं तर तुमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काय काय घडलं ते सर्व उघड करावं लागेल, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

3:05 PM, 25 Jun 2024 (IST)

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुक्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

2:03 PM, 25 Jun 2024 (IST)

ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार जो मार्ग काढेल त्याला पाठिंबा - शरद पवार

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारत तीस जागांवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सत्ताधारी आणि विरोधकांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन मंगळवारी पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान राज्यातील ओबीसी आणि मराठा आंदोलनासंदर्भात आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार जो मार्ग काढेल, त्याला आपलं समर्थन असेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

12:11 PM, 25 Jun 2024 (IST)

हिंगोली लोकसभेच्या खासदारांना दुसऱ्यांदा घ्यावी लागली खासदारकीची शपथ

हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी आष्टीकर यांनी त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. दुसरीकडं राष्ट्रवादीच्या नवर्निवाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

12:08 PM, 25 Jun 2024 (IST)

नागपूर विमानतळात स्फोट घडवू, सलग दुसऱ्या दिवशी धमकीचा ई-मेल

नागपूर विमानतळात स्फोट घडवू, अशा आशयाचा धमकीचा ई-मेल पुन्हा एकदा नागपूर विमानतळ प्रशासनाला मिळाला आहे. त्यानंतर विमानतळ प्रशासनानं पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली असून पोलिसांकडून विमानतळ परिसरात कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपूर विमानतळावर स्फोट घडवण्यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची ही चौथी घटना आहे. सोमवारीसुद्धा अशाच आशयाचा धमकीचा ई-मेल ( तिसरा ईमेल ) नागपूर विमानतळ प्रशासनाला मिळाला होता....

11:33 AM, 25 Jun 2024 (IST)

संविधान विसरले तर त्यांना पुढच्या वेळी 240 जागाही मिळणार नाहीत-खासदार महुआ मोइत्रा

काँग्रेस राजवटीत आणीबाणी लादली होती, याची आठवण करून देत पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावर टीका केली. त्यावर तृणमुल पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यांनी म्हटले,

"गेल्या 10 वर्षात न्यायव्यवस्था दडपून अघोषित आणीबाणी सुरू आहे. जर ते संविधान विसरले तर त्यांना पुढच्या वेळी 240 जागाही मिळणार नाहीत."

11:12 AM, 25 Jun 2024 (IST)

आम्हाला लोकसभेचं उपाध्यक्ष पद मिळायला हवं-राहुल गांधी

आम्हाला लोकसभेचं उपाध्यक्ष पद मिळायला हवं. जर त्यांनी आम्हाला उपाध्यक्ष पदासाठी दिला तर आम्ही लोकसभा अध्यक्ष पदासाठी पाठिंबा देऊ. त्यांनी आम्हाला लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी पाठिंबा भाजपानं मागितला आहे. मात्र, त्यांची नियत साफ नाही. पंतप्रधान मोदी बोलतात एक आणि दुसरेचं करतात. राजनाथ सिंह यांनी अद्याप काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना फोन केला नसल्याचं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.

10:48 AM, 25 Jun 2024 (IST)

कंगणा राणौत यांनी केलेली मागणी हास्यास्पद आणि मुर्खपणाची-संजय राऊत

कंगणा राणौत यांनी महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची केलेली मागणी मुर्खपणाची आणि हास्यास्पद आहे. कंगणा यांची राहण्याची व्यवस्था हिमाचलभवनमध्ये व्हावी, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते.

9:29 AM, 25 Jun 2024 (IST)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार

मुंबई- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी निवडणुकीचे निकालही जाहीर होतील. राज्यात 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुका होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडं 27 जुलै रोजी विधान परिषदेचे 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

8:47 AM, 25 Jun 2024 (IST)

घराला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू

दिल्लीतील प्रेम नगर परिसरात एका घराला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. ही आग पहाटे साडेतीनच्या सुमारास लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील चार जणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Last Updated : Jun 25, 2024, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.