बंगळुरू Lokayukta Raids in Karnataka : कर्नाटकातील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापेमारी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील अधिकाऱ्यांच्या घरावर एकाच वेळी 11 जिल्ह्यात ही छापेमारी सुरू आहे. कर्नाटकातील बंगळुरू, मंड्या, म्हैसूर, हसन, तुमकूर, चिक्कमंगळुर, कोपला, बेल्लारी, विजयनगर, मंगळुरू आदी ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात येत आहे. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
#WATCH | Mandya, Karnataka | Lokayukta raids underway at six places of one of the officials of the PWD Department. pic.twitter.com/dyAYPWhRUG
— ANI (@ANI) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mandya, Karnataka | Lokayukta raids underway at six places of one of the officials of the PWD Department. pic.twitter.com/dyAYPWhRUG
— ANI (@ANI) January 31, 2024#WATCH | Mandya, Karnataka | Lokayukta raids underway at six places of one of the officials of the PWD Department. pic.twitter.com/dyAYPWhRUG
— ANI (@ANI) January 31, 2024
या अधिकाऱ्यांच्या घरावर सुरू आहे छापेमारी : लोकायुक्तांच्या पथकानं टाकलेल्या छाप्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांची झाडाझडती सुरू आहे. यात तमुकूर, हनुमंथरायप्पा, कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास लिमिटेड मंड्या, हर्षा, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिकमंगळुर, नेत्रावती, मुख्यतंत्रज्ञान अधिकारी, हसन, अन्न निरीक्षक कोप्पल, रेणुकम्मा, वनविभाग चामराजनगर, पी रवी, ग्रामीण विकास विभाग म्हैसूर, यज्ञेंद्र मुडा, बल्लारी, बी रवी, सहायक प्राध्यापक, विजयनगर, भास्कर, विद्युत विभाग मंगळुरू, शांता कुमार एचएमएमएस आदींचा समावेश आहे.
बांधकाम विभागातील अभियंत्याच्या घरावर छापेमारी : लोकायुक्तांनी कर्नाटकातील अनेक अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली. यात मंड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षा यांचा देखील समावेश आहे. हर्षा यांच्या कार्यालयासह त्यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकला. यात बंगळुरूमधील विद्यारण्यपुरा इथलं घर, त्यांच्या मंड्या जिल्ह्यातील नातेवाईकांची घरं, मंड्याचं कार्यालय, कल्लाहल्ली इथ असलेल्या सासरच्या घरावर आणि नागमंगला इथल्या फार्महाऊसवर छापे टाकण्यात आले.
अन्न निरीक्षकाच्या घरासह कार्यालयावर छापेमारी : लोकायुक्तांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि छापेमारी प्रकरणामुळं अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हसन इथल्या अन्न आणि पुरवठा निरीक्षकाच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली. यावेळी लोकायुक्तांच्या पथकानं अन्न आणि पुरवठा निरीक्षकाच्या घरासह कार्यालयाची झाडाझडती घेतली. रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या त्यांच्या भावाच्या कार्यालय आणि घरावर देखील लोकायुक्त विभागाचे पोलीस अधिक्षक मल्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक तिरुमलेश, निरीक्षक बाळू आणि शिल्पा यांच्या पथकानं छापा टाकला.
हेही वाचा :