ETV Bharat / bharat

लोकसभा अधिवेशन 2024; लोकसभेचं उपसभापती पद द्या, राहुल गांधींची मागणी, ओम बिर्लांनी भरला सभापती पदासाठी अर्ज - Lok Sabha Session 2024 - LOK SABHA SESSION 2024

Lok Sabha Session 2024 : लोकसभा अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. राजनाथ सिंग यांनी विरोधकांनी सभापती पदासाठी पाठींबा देण्याची विनंती मल्लिकार्जुन खरगे यांना केली. यावेळी राहुल गांधी यांनी उपसभापती पदाची मागणी केली.

Lok Sabha Session 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 12:28 PM IST

नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 : लोकसभा अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. यावेळी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या शपथविधीला ठाकरे गटानं विरोध केला. तर निलेश लंकेंनी इंग्रजीतून खासदार पदाची शपथ घेतली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी उपसभापती पद देण्याची मागणी केली. उपसभापती पद दिल्यास सत्ताधाऱ्यांना पाठींबा देऊ, अशी अट राहुल गांधी यांनी ठेवली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा फोन आल्यानंतर राहुल गांधी यांनी ही अट ठेवली. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांना राजनाथ सिंग यांचा फोन : लोकसभा सभापती पदासाठी विरोधकांनी पाठींबा द्यावा, यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राहुल गांधी यांनी विरोधकांचा पाठींबा हवा असल्यास आम्हाला उपसभापती पद द्या, अशी अट ठेवली. त्यांच्या या अटीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

ओम बिर्ला यांनी भरला लोकसभा सभापतीसाठी अर्ज : एनडीएकडून माजी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा सभापती पदासाठी अरज भरला आहे. या अगोदर ओम बिर्ला यांनी सभापती म्हणून चांगलं काम केल्यानं त्यांना पुन्हा ही संधी देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडं विरोधकांकडून के सुरेश हे लोकसभा सभापती पदासाठी अर्ज भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, विरोधकांचे टोचले कान - First Session Of 18th Lok Sabha
  2. लोकसभा अधिवेशन 2024 : आजपासून लोकसभेच्या अधिवेशनाला होणार सुरुवात, पंतप्रधानांसह नवीन सदस्यांचा होणार शपथविधी - Lok Sabha Session 2024
  3. निकालाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात; रवींद्र वायकर व निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल - Petition Against Ravindra Waikar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.