कैथल (हरियाणा) Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाच्या ईएनसीओआरई (ENCORE) पोर्टलवर एआरओ (ARO) चा डोमेन आयडी पासवर्ड लीक झाल्याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी राज्यपालांच्या आदेशानुसार कैथल एसडीएम आणि एआरओ ब्रह्मा प्रकाश यांना तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलंय. शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एआरओनं 4 संगणक परिचालक आणि एका कनिष्ठ प्रोग्रामरला निलंबित केलं होतं.
हे सुनियोजित षडयंत्र : 'इंडिया' आघाडीचे कुरुक्षेत्र लोकसभेचे उमेदवार डॉ. सुशील गुप्ता शनिवारी या प्रकरणी कैथलला पोहोचले होते. ते म्हणाले, "ही घटना देशातील निष्पक्ष निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. हा सुनियोजित कट होता. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची कठोर दखल घ्यावी. हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडंही याबाबत तक्रार करण्यात येणार आहे."
आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल : सुशील कुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी उशिरा कैथल येथील रहिवासी संगणक ऑपरेटर शिवांग आणि त्याचा मित्र प्रवीण यांना अटक केली. या दोघांनी हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दोघांनाही न्यायालयात हजर करुन कोठडी घेण्यात येणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण : आम आदमी पक्षानं रॅलीच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. यासोबतच अर्जावर शिव्याही लिहिल्या होत्या. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर एआरओ ब्रह्म प्रकाश यांनी तातडीनं कारवाई करत 5 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एआरओनं पोलिसांना पत्रही लिहिलं होतं.
'आप'ला रॅलीला परवानगी : त्याचवेळी दोन्ही दिवशी आम आदमी पार्टीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलीय. पोलीस तक्रारीत एसडीएम कम एआरओ ब्रह्म प्रकाश यांनी सांगितलं की 3 एप्रिल रोजी शुभम राणा यानं दोन दिवस राजकीय जाहीर सभा आयोजित करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त केला होता. जो काही व्यक्तीनं आयडी हॅक करुन रद्द केला होता.
हेही वाचा :