ETV Bharat / bharat

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन - Laxmikant Dixit passes away

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 1:02 PM IST

Laxmikant Dixit Passed Away : या वर्षी जानेवारीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्यातील प्रमुख पूजारी वाराणसीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी (22 जून) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं.

Laxmikant Dixit Passed Away
रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन (Source ETV Bharat)

वाराणसी Laxmikant Dixit Passed Away : जानेवारी महिन्यात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी असणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी (22 जून) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे असले तरी त्यांचं कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून काशी येथे वास्तव्यास आहे. वाराणसीच्या विद्वानांमध्ये पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं अनन्यसाधारण स्थान होतं. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडं काशीच्या विद्वान परंपरेचं प्रतीक म्हणून पाहिलं जात असे.

काकांकडून घेतली वेद आणि विधींची दीक्षा : लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक होते. काशीच्या राजाच्या मदतीनं सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत यांची काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम विद्वानांमध्ये गणना होते. पूजेच्या पद्धतीतही त्यांचं प्राविण्य होतं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.

पंडित गागा भट्ट यांचे वंशज : पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज प्रसिद्ध पंडित गागा भट्ट होते. गागा भट्ट यांनी 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. तर पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली 121 पंडितांनी मिळून 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेचा विधी केला होता. काशीतील 40 हून अधिक विद्वान या संघात सामील झाले होते. राम मंदिरातील पूजा पूर्ण झाल्यानंतर गर्भगृहात मुख्य पुजारी म्हणून लक्ष्मीकांत दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला.

हेही वाचा -

  1. रामलल्ला अयोध्येत विराजमान! पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा सोहळ्याचा व्हिडिओ
  2. अयोध्येत श्रीरामाचा जल्लोष ; सूर्यकिरणांनी उजळले रामलल्लाचे ललाट, पाहा व्हिडिओ - Ayodhya Ram Navami 2024
  3. रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म, सामाजिक एकतेचं उदाहरण देणारं 'हे' ठेवलं नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.