कोलकात्ता Kolkata Doctor Murder Case : आरजी कार डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरण आता सीबीआयकडं सोपवण्यात आलं आहे. सीबीआयनं या प्रकरणातील चौकशीला सुरुवात केली. सीबीआयनं या प्रकरणातील पीडितेच्या पालकांची भेट घेतली. यावेळी पीडितेच्या पालकांनी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टरांचा सहभाग असल्याचा आरोप सीबीआयकडं केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितेच्या पालकांनी इटर्न डॉक्टरांवर आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: Former principal at RG Kar Medical College and Hospital Sandip Ghosh reaches CBI office. pic.twitter.com/rxNm4JabAf
— ANI (@ANI) August 17, 2024
पीडितेच्या पालकांनी इंटर्न डॉक्टरांची सीबीआयला दिली नावं : पीडित पालकांची भेट घेतल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, "पीडित डॉक्टरच्या पालकांनी काही इंटर्न डॉक्टरांवर या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संशयित इटर्न डॉक्टरांची नावं त्यांनी आमच्याकडं दिली आहेत. त्यामुळे सीबीआयनं 29 संशयितांच्या नावांची यादी बनवली आहे," असं स्पष्ट केलं. पीडितेच्या पालकांनी आरजी कार रुग्णालयाच्या काीह इंटर्न डॉक्टरांची नावं संशयित म्हणून घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे या घटनेची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठातांची चौकशी : आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी सीबीआयनं तपास सुरू केला आहे. सीबीआयनं आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ संदीप घोष यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी नेलं आहे. त्यासह सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 9 ऑगस्टच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. संदीप घोष यांनी घटना घडल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन सुरक्षेची मागणी केली. आपल्यावरही हल्ला होऊ शकतो, अशी भीती संदीप घोष यांनी व्यक्त केलेली आहे.
हेही वाचा :
- डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण : रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या 19 जणांना अटक, डॉक्टर संघटनांचा संप सुरूच - Doctor Rape Murder Case
- डॉक्टर तरुणी खून प्रकरण : मार्ड डॉक्टरांचा संप, तर पुण्यातील 'ससून'मधील निवासी डॉक्टर संपावर - Kolkata Doctor Rape Murder Case
- महिला डॉक्टर हत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांचा उद्या देशव्यापी संप; आयएमएकडून 48 तासांचा अल्टिमेटम - Kolkata Doctor Murder Case