Teddy Day 2024 व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस प्रेम व्यक्त करण्याचा वेगवेगळा मार्ग दाखवतो. दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी हे दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो. आज 'व्हॅलेंटाइन डे' चा चौथा दिवस म्हणजे टेडी डे. प्रेमाच्या इतर दिवसांप्रमाणं हा दिवस देखील प्रेमीयुगलांसाठी खूप खास असतो. टेडी डेच्या दिवशीही प्रेमीयुगल मनापासून प्रेम व्यक्त करतात. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला टेडी बीयर गिफ्ट करतात.
लाल रंगाचा टेडी : लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम आणि पॅशनचे प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या टेडीच्या सहाय्याने तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे सांगा.
गुलाबी रंगाचा टेडी : गुलाबी रंग मैत्रीचं प्रतीक आहे. प्रेमाचा प्रस्ताव स्विकारला आहे हे कुणाला सांगायचं असेल तर गुलाबी रंगाचा टेडी भेट म्हणून द्या.
निळ्या रंगाचा टेडी : तुमच्या खास व्यक्तीला वचन द्यायचं असेल आणि नात्यात कमिटमेंट दाखवायची असेल तर निळ्या रंगाचा टेडी बेअर द्या. ही भेट दर्शवेल की, तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी एकत्र पाहू इच्छित आहात आणि नात्यात कमिटमेंट करत आहात.
हिरव्या रंगाचा टेडी : तुमचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. पण तरीही तुम्ही त्याच्यावर प्रेम करता हे सांगायचं असेल तर, हिरव्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट द्या. हिरवा रंग दर्शवितो की, आपण नेहमी नात्यात कमिटेड राहाल.
ऑरेंज रंगाचा टेडी : ऑरेंज टेडी बेअर एखाद्या व्यक्तीला तो तुमच्या आयुष्यात किती खास आहे, हे व्यक्त करण्यासाठी भेट देऊ शकता. याद्वारे तुम्ही सांगू शकता की, तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती किती खास आहे.
'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्याची सुरुवात कशी झाली? : 'व्हॅलेंटाईन्स डे' दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. असं म्हणतात की, त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरू होता. 'व्हॅलेंटाईन्स डे'ची ही कहाणी त्यांच्या प्रेमाला आणि त्यागाला समर्पित आहे. ज्यांच्या नावाने नंतर 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा केला जाऊ लागला.
'व्हॅलेंटाईन डे' पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात रोमन सनापासून झाली. 496 साली जगात प्रथमच 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर, पाचव्या शतकात, रोमच्या पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून रोमसह जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला. या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'ई टिव्ही भारत' याची पुष्टी करत नाही.
हेही वाचा -