ETV Bharat / bharat

विमानतळावर CISF महिला जवानानं का फोडलं कंगना रणौतचं थोबाड? - Kangana Ranaut slapped

Kangana Ranaut Slapped : अभिनेत्री कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची माहिती समोर येत आहे. कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर 'सीआयएसएफ'च्या महिला जवानानं कानशिलात लगावल्याचा आरोप कंगना रणौतनंच केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 5:41 PM IST

Updated : Jun 6, 2024, 7:26 PM IST

Kangana Ranaut
कंगना रणौत (ETV BHARAT File Photo)

चंदीगड Kangana Ranaut Slapped : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं चंदीगड विमानतळावर CISF महिला जवाणानं कानशिलात लगावल्याचा आरोप केला आहे. तसंत संबंधित जवानावर कठोर कारवाई करण्याची मागणी कंगनानं केलीय आहे. चंदीगड विमानतळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना त्या महिला जवानाला भांडताना दिसत आहे. कानशिलात मारणाऱ्या जावानाचं नाव कुलविंदर कौर असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याचं सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

कठोर कारवाईची मागणी : मंडीतील भाजपा खासदार कंगना राणौतनं गुरुवारी आरोप केला की, ती दिल्लीला जात असताना चंदीगड विमानतळावर एका CISF च्या महिला सुरक्षा जवानानं तिला चापट मारली. रणौतच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट UK707 मध्ये बसण्यासाठी विमानतळावरील बोर्डिंग पॉईंटकडं जात होती, त्यावेळी CISF जवान कुलविंदर कौर यांनी तिच्या कानशिलात मारली. त्यानंतर हा प्रकार का घडला यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सीआयएसएफ महिला जवानावर कडक कारवाई करण्याची मागणी कंगनानं केली आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाच्या वक्तव्यावर आक्षेप : रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतनं याप्रकरणी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनानं दिलेल्या वक्तव्यामुळं सीआयएसएफ महिला जवान संतप्त झाल्याचं तिचं म्हणणे आहे. याच कारणामुळं जवानानं कानशिलात मारल्याचा आरोप कंगनानं केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंडी मतदारसंघातून कंगना लोकसभेत : अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं कंगनाला तिकिट दिलं होतं. कंगनानं दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाला विक्रमादित्य सिंह यांना हरवलं. मागील काही वर्षापासून कंगना विविध वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असते. आता चक्क कानशिलात लगावल्याचा आरोप कंगनानं केलाय.

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीसांची संध्याकाळी बैठक - Vinod Tawde meets Amit Shah
  2. लोकसभा निकालानंतर खदखद बाहेर; पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, विखे-लंके कार्यकर्ते भिडले - Rahul Zaware Car Attack
  3. महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीसांची संध्याकाळी बैठक - Vinod Tawde meets Amit Shah

Last Updated : Jun 6, 2024, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.