ETV Bharat / bharat

जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दुसऱ्या लाईनचा रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 8:31 PM IST

Updated : Feb 28, 2024, 10:48 PM IST

जामताड़ा: Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रवासी ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवासी दुसऱ्या लाईनचा रुळ ओलांडत असताना त्यांना बँग एक्स्प्रेसनं धडक दिली. यामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आग लागल्यामुळे बाहेर पडले : रेल्वे लाईनवरुन बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेस जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती. मात्र, धूळ पाहून गाडीला आग लागल्याचं आणि धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशीही ट्रेनमधून लगेच उतरले. त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्गावर जाणाऱ्या ट्रेनची धडक बसून प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जामताराचे एसडीएम अनंत कुमार यांनी सांगितले की, लवकरच रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल.

नेमकं काय घडलं? : बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन लाईनवरुन जात होती. त्याचवेळी रेल्वेरूळाच्या शेजारी टाकलेल्या भरावाची धूळ उडाली. हे पाहून आग लागल्याने धूर निघत असल्याचा चालकाचा समज झाला. संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यानं रेल्वे थांबवली. अचानक आग लागल्याची रेल्वेत अफवा पसरली. त्यामुळे डब्यात गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण दरवाच्या दिशने धावू लागला. यात कोणताही विचार न करता प्रवाशांनी धडाधड उड्या टाकल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ईएमयू ट्रेनने प्रवाशांना चिरडलं. यात काही जणांचा जागी मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहेत. जामतारा उपायुक्तांनीही रेल्वे अपघातात काही लोकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "जामतारा येथील कालाझारिया रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रेननं प्रवाशांना चिरडले. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सुरूवातीला 2 असा आला होता. तसंच, आणखीही घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे."

हेही वाचा :

1 मुख्यमंत्र्यांची निवेदनांवर खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

2 'माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे'; संजय राऊत यांचा मोठा दावा

3 आंतरराष्ट्रीय सीमेवर पर्यटनाला चालना देण्यासाठी सांबामध्ये 'होम स्टे' सुरू

Last Updated : Feb 28, 2024, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.