श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी (20 ऑक्टोबर) रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी स्थानिक आणि परराज्यातील मजुरांवर गोळीबार केला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सैनिकांनी सदरील परिसराची नाकेबंदी केली आहे.
- दहशतवाद्यांना सोडणार नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. "या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडणार नाही. तसंच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या जोरदार प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल," असंही ते म्हणाले.
I strongly condemn the horrific terror attack on innocent laborers in Gagangir, Sonamarg, Jammu & Kashmir, who were engaged in a vital infrastructure project.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 20, 2024
I offer my humble tribute to the martyred laborers and extend my deepest condolences to their families during this…
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला काय म्हणाले? : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मजुरांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केलाय. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले की, "कामगार हे परिसरातील एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2-3 जण जखमी झाले आहेत. मी नि:शस्त्र निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो." गंभीर जखमींना SKIMS श्रीनगर येथे पाठविण्यात आलं आहे. जखमी बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Very sad news of a dastardly & cowardly attack on non-local labourers at Gagangir in Sonamarg region. These people were working on a key infrastructure project in the area. 2 have been killed & 2-3 more have been injured in this militant attack. I strongly condemn this attack on…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 20, 2024
नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "एका महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी काम करत असलेल्या गगनगीर, सोनमर्ग, जम्मू आणि काश्मीरमधील निष्पाप मजुरांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो."
The dastardly terror attack on civilians in Gagangir, J&K, is a despicable act of cowardice. Those involved in this heinous act will not be spared and will face the harshest response from our security forces. At this moment of immense grief, I extend my sincerest condolences to…
— Amit Shah (@AmitShah) October 20, 2024
हेही वाचा -
- किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, अनंतनागमध्ये दोन जवान हुतात्मा - Anantnag encounter updates
- जम्मूच्या राजौरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला; एक जवान जखमी, सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर - Terrorist Attack In Jammu Kashmir
- पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? स्वत: पोलीस आयुक्तांनी दिलं पत्र - Terrorist Attack Possibility Pune