जबलपूर Jabalpur double murder case : 15 मार्च रोजी जबलपूरमध्ये रेल्वेत काम करणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीनेच आपल्या प्रियकर मुकुल सिंहसह स्वत:च्या वडील आणि लहान भावाची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्या झालेल्या व्यक्तीचीच मुलगी आरोपीबरोबर फिरताना दिसत आहे. मुख्य आरोपी मुकुल अद्याप फरार आहे मात्र, अल्पवयीन मुलीला हरिद्वार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय होतं जबलपूर हत्याकांड?
15 मार्च रोजी जबलपूरमधील सिव्हिल लाइन परिसरातील रेल्वेच्या मिलेनियम कॉलनीत राहणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा आणि त्याच्या आठ वर्षीय मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजकुमारचा रक्तानं माखलेला मृतदेह स्वयंपाकघरात पॉलिथिनमध्ये बंद होता. तर तनिष्कचा मृतदेह फ्रिजमध्ये आढळून आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती राजकुमारच्या भावामार्फत मिळाली होती. राजकुमारच्या मुलीनेच राजकुमारच्या भावाला मेसेज केला होता. की, मुकुल सिंहनं माझ्या वडिलांची आणि भावाची हत्या केली आहे.
बदलत होती ठिकाणं: घटनेच्या सुरुवातीला अल्पवयीन मुलीचं अपहरण मुकुलन केलं असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सत्य समोर आलं आहे. मुकुल सिंह आणि मृतकाच्या अल्पवयीन मुलीनेच तिच्या वडिलाची आणि भावाची हत्या केली आहे. हे प्रेमी युगल गेल्या 2 महिन्यांपासून जबलपूर पोलिसांना सतत चकमा देत होते. कधी बेंगळूरुमध्ये तर कधी मथुरेत हे जोडपं दिसलं. हे दोघेही हरिद्वारला गेले होते. पण त्याचं फायनल लोकेशन नेपाळला दिसत होतं. ज्यामध्ये मुकुल सिंह आता भारत सोडून नेपाळच्या दिशेने गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळं भारत-नेपाळ सीमेवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे.
जबलपूर पोलीस हरिद्वारला रवाना झाले: माहितीच्या आधारे पोलिसांनी मुकुल सिंहच्या प्रेयसीला, अल्पवयीन मुलीला हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे. जबलपूर पोलीस हरिद्वारला रवाना झाले आहेत. मुलीला तेथून ताब्यात घेतलं जाईल. घटनेतील मुख्य आरोपी मुकुल सिंह अद्याप फरार आहे. पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरु असल्याची माहिती जबलपूरचे पोलीस अधिक्षक आदित्य प्रताप सिंह यांनी दिली.
हेही वाचा