ETV Bharat / bharat

इसीसचा दहशतवादी रिझवान अलीला ठोकल्या बेड्या ; काळाचौका पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल, पुण्यात बनवायचा आयईडी - ISIS Terrorist Rizwan Ali Arrested - ISIS TERRORIST RIZWAN ALI ARRESTED

ISIS Terrorist Rizwan Ali Arrested : दिल्लीच्या विशेष पथकानं कुख्यात दहशतवादी रिझवान अली याला बेड्या ठोकल्या आहेत. रिझवान अली हा पुण्यात आईडी बनवून देशात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होता. त्याच्यावर मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात UAPA नुसार गुन्हा दाखल आहे.

ISIS Terrorist Rizwan Ali Arrested
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 7:58 AM IST

नवी दिल्ली ISIS Terrorist Rizwan Ali Arrested : इसीसचा कुख्यात दहशतवादी रिझवान अली याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं बेड्या ठोकल्या आहेत. रिझवान अली हा मागील एक वर्षापासून सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देत आपली ठिकाणं बदलत होता. रिझवान अलीचा सहकारी शाहनवाज आलम याला विशेष सेलनं ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्लीतील जैतपूर एक्स्टेंशन इथून अटक केली. मात्र यावेळी कुख्यात दहशतवादी रिझवान अली याला पोलिसांना पकडता आलं नाही. विशेष म्हणजे रिझवान अली याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात 22 जुलै 2023 ला UAPA सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

झारखंडमधून दिल्लीत आला होता शिकण्यासाठी : रिझवान अली हा कुख्यात दहशतवादी 2017 मध्ये झारखंडमधून दिल्लीत शिकण्यासाठी आला होता. त्यानं दिल्लीतील शाहीन बाग परिसरात आपला तळ ठोकला. या दरम्यान त्याची शाहनवाज याच्याशी मैत्री झाली. शाहनवाज आणि रिझवान हे दोघं अन्य दोघांसोबत मिळून मोठा घातपात घडवण्याचा कट रचत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अनेक दहशतवाद्यांच्या संपर्कात होता रिझवान : "रिझवान अली हा 2015-16 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकला होता. त्यातूनच तो इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन ( ISIS ) पुणे मॉड्यूलच्या अनेक दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. मूळचा झारखंडचा असलेला रिझवान शिक्षणासाठी दिल्लीत आला. मात्र दिल्लीत आल्यानंतर त्यानं कट्टरवाद्यांशी गाठीभेटी घेतल्या. दिल्लीत आल्यानंतर रिजवान यानं 2017 मध्ये शाहनवाज आलमची भेट घेतली. शिक्षणासाठी आलेला शाहनवाज रिझवानच्या इतका जवळ आला की दोघंही चांगले मित्र बनले. दोघांना हिजरत करण्यासाठी पैसे जमवायचे होते, मात्र त्यातूनच ते गुन्ह्यात अडकत गेले," असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला.

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला : रिझवान अली आणि शाहनवाज हे दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठी आखणी करत होते. त्यातच आयईडी तयार करण्यासाठी ते साहित्य गोळा करत होते. रिजवान आणि त्याचा मित्र शाहनवाज हे एप्रिल 2022 मध्ये पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र इम्रान आणि युनूस साकी यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यावेळी हे दोघंही इम्रान आणि युनूस साकी यांच्या संपर्कात आले. या दोघांनी मिळून आयईडी तयार करण्यासाठी साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. इम्रान आणि युनूसला पोलिसांनी अटक केल्यानंतर रिझवान आणि शाहनवाज फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी शाहनवाजला बेड्या ठोकल्या. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस, दिल्ली पोलीस आणि एनआयए रिझवानचा कसून शोध घेत होते. मात्र रिझवान सातत्यानं आपली ठिकाणं बदलून सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होता. त्यामुळे एनआयएनं त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं.

दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं फरार दहशतवादी रिझवानला 8 ऑगस्टला दर्यागंज परिसरात बेड्या ठोकल्या. रिझवाननं ISIS ऑपरेटरशी संपर्क करताना पूर्ण खबरदारी घेतली. रिझवानला अटक करण्यापूर्वी गोळीबार करण्यात आला. यावेळी त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसं याशिवाय विशेष पथकानं घटनास्थळावरुन दारूगोळाही जप्त केला. या प्रकरमी आता स्पेशल सेल पोलीस ठाण्यात बीएनएस आणि आर्म्स अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला. विशेष म्हणजे रिझवान अलीविरुद्ध 22 जुलै 2023 रोजी मुंबईतील काळाचौकी इथं एटीएसनं आयपीसीच्या कलम 379, 468, 511, 34, कलम 3(25) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात शस्त्रास्त्र कायदा , 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 आणि UAPA च्या कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा :

  1. ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींवर आरोपपत्र दाखल
  2. विशाखापट्टणम पाकस्तान हेरगिरी प्रकरण ; एनआयएनं मुंबईतून एका आरोपीला केलं अटक
  3. Pune ISIS Module Case : इसीस प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; कोंढवा येथील प्रॉपर्टीज जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.