ETV Bharat / bharat

बांद्रा येथील कॉलेजचे चार तरुण खालापूर धरणात बुडाले - Maharashtra Breaking News Live - MAHARASHTRA BREAKING NEWS LIVE

international yoga day 2024
ब्रेकिंग फाईल फोटो (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 7:28 AM IST

Updated : Jun 21, 2024, 7:56 PM IST

Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra

LIVE FEED

7:55 PM, 21 Jun 2024 (IST)

बांद्रा येथील कॉलेजचे चार तरुण खालापूर धरणात बुडाले

मुंबईतील बांद्रा येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पावसाळी सहलीतील चार जण बुडाले

खालापूर तालुक्यातील वावर्ले ग्रामपंचायतमधील पोखरवाडीजवळील सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाले.

एकूण 37 युवक युवती आले होते पावसाळी सहलीला.

घटनास्थळी खालापूर पोलीस दाखल.

7:29 PM, 21 Jun 2024 (IST)

रविंद्र वायकर व निवडणूक आयोग यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार खासदार रविंद्र वायकर यांच्या विजयावर संशय घेत रविंद्र वायकर व निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

5:58 PM, 21 Jun 2024 (IST)

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरातील गोरेगाव पश्चिम येथे साठे मैदानाजवळ असलेल्या रिद्धी आयुर्वेदा वेलनेस सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी कक्षाला मिळाली होती. या माहितीनुसार अंमलबजावणी कक्षाने गोरेगावात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गोरख धंदा उध्वस्त केला आहे. याप्रकरणी आरोपी मुकेश उर्फ राहुल सुशील सहाने याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार अधिनियम कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

5:16 PM, 21 Jun 2024 (IST)

सीईटी पेपरबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा

मुंबई : नीट परीक्षेच्या गोंधळानंतर आता राज्यातील सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना(उबाठा) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ५४ चुका झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार केली, त्यांचीच परीक्षा घेण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले. सीईटी सेलकडून गुणांऐवजी पर्सेंटाईल दिले जातात. त्यामध्ये देखील गोंधळ झाला आहे. कमी गुण मिळालेल्यांना जास्त पर्सेंटाईल व जास्त गुण मिळालेल्यांना कमी पर्सेंटाईल देण्यात आले आहेत. त्यामुळे पर्सेंटाईल ठरविण्याचे नेमके निकष काय आहेत, याची माहिती सीईटी सेलने देण्याची गरज आहे. सीईटी सेलच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला.

4:33 PM, 21 Jun 2024 (IST)

संत मुक्ताबाईंच्या पालखीला पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान, पालखी आज बुलढाण्यात मुक्कामी

बुलढाणा : आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईबाईची पालखीने 18 जून रोजी कोथळी, मुक्ताईनगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा प्रस्थान करत करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजुर घाटामध्ये पोहचला. प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजुर घाट दुमदुमला. आज पालखी बुलडाणा येथे मुक्कामी आहे.

4:19 PM, 21 Jun 2024 (IST)

अटल सेतूवर तडा गेलेल्या भागाची नाना पटोलेंनी केली पाहणी

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अटल सेतूवर तडा गेलेल्या भागाची पाहणी केली.

3:30 PM, 21 Jun 2024 (IST)

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेबाबत उच्च न्यायालय 25 जूनला निकाल देणार

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटके बाबत उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून याबाबत 25 जून रोजी निकाल देण्यात येणार आहे. पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तत्काळ मुक्त करण्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी आज सुनावणी झाली.

1:49 PM, 21 Jun 2024 (IST)

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, सुदैवानं जीवितहानी नाही!

बार्शी तालुक्यात फटाक्यांच्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. स्फोटात वेलकम फायर कारखान्याचे चाळीस लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

1:25 PM, 21 Jun 2024 (IST)

दिल्ली उच्च न्यायालयाची अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर स्थगिती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टातून जामीन मिळूनही त्याची सुटका लांबली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या सुटकेला स्थगिती दिली. मद्यधोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत.

12:57 PM, 21 Jun 2024 (IST)

ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची ओबीसी शिष्टमंडळासोबत आज बैठक

महाराष्ट्र पोलीस दलाचं आधुनिक केलं जाणार आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी तसेच गुन्ह्याचा वेगवान तपास करण्यासाठी (AI) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

12:11 PM, 21 Jun 2024 (IST)

मध्य प्रदेशातील शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात येणार राम-कृष्णाचे धडे

मध्यप्रदेशातील अभ्यासक्रमातून राम आणि कृष्णाचे धडे शिकविले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. यादव केली. राज्य सरकारने रामपथ गमन आणि श्री कृष्ण पथ गमन हे दोन प्रकल्पांचे विकास काम हाती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

12:07 PM, 21 Jun 2024 (IST)

मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळानं उपोषण करणाऱ्या ओबीसी नेत्यांची घेतली भेट

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात शुक्रवारी एका मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळानं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागण्यांवर चर्चा केली. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, अतुल सावे आणि उदय सामंत यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हाके आणि वाघमारे यांना दिलं आहे.

9:27 AM, 21 Jun 2024 (IST)

अमेरिकेकडून रशियन कंपनी कॅस्परस्कीच्या सॉफ्टवेअरवर बंदी

अमेरिकेने रशियाच्या सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीने तयार केलेल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. कंपनीकडून अमेरिकेच्या सायबर सुरक्षेला धोका असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.

8:05 AM, 21 Jun 2024 (IST)

मुंबईतील योगदिनात पीयूष गोयल यांच्यासह अभिनेता जॅकी श्रॉफचा सहभाग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईत योग सत्रात भाग घेतला. भाजपा नेत्या शायना एनसी, अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीदेखील योगासन करून योगदिनात सहभाग घेतला.

8:01 AM, 21 Jun 2024 (IST)

योग केवळ विद्या नसून विज्ञान आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीनगरमधील योगदिनाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी नागरिकांनी संबोधित केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, " जम्मू काश्मीर ही योगची भूमी आहे. योग केवळ विद्या नसून विज्ञान आहे. योगमुळे एकाग्रता वाढते. अंतराळवीरांनादेखील योग आणि ध्यानाचं प्रशिक्षण दिले जाते. कैद्यांना सकारात्मक करण्यासाठी योग शिकविला जातो. योगदिनामुळे सकारात्मकतेला चालना मिळेल, असा विश्वास आहे. श्रीनगरमधून मी देशातील नागरिकामुळे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योगासने करणाऱ्या लोकांना योगदिनाच्या शुभेच्छा देतो."

7:39 AM, 21 Jun 2024 (IST)

केंद्रीय मंत्र्यांनी योगासने करत योगदिनात घेतला सहभाग

  • केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीमध्ये योगासने केली.
  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्ली येथे योग सत्रात भाग घेत आहेत.
  • दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिल्लीतील योग दिनाच्या कार्यक्रमात योगासने केली.
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे योगासने केली.
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ITBP मधील जवानांनी लेहमधील पँगॉन्ग त्सो येथे योगासने केली.

7:34 AM, 21 Jun 2024 (IST)

नागपूरमधील योगदिनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी

नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय दिनाचं आयोजन करण्यात आलं. या योगदिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत.

Last Updated : Jun 21, 2024, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.