ETV Bharat / bharat

पाकिस्तानची मुलगी बनली भारताची सून, चर्चा तर होणारच! - BRIDE FROM PAKISTAN

सीमावर्ती जिल्ह्यातील हनुमानगढ येथील पिलीबंगा परिसरातील लग्नाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.

Indian groom get married with bride from pakistan in Rajasthan
पाकिस्तानची मुलगी बनली भारताची सून (ETV Bharat Jaipur)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2024, 11:14 AM IST

Updated : Dec 13, 2024, 11:38 AM IST

जयपूर : भारत-पाकिस्तानमध्ये राजकीय आणि राजनयिक संबंध चांगले नाहीत. म्हणूनच दोन्ही देशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये होणारे विवाह चर्चेचे ठरतात. काही महिन्यांपूर्वी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना (Sachin Meena) ही जोडी आपल्या लग्नामुळे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही देशांमध्ये चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा अशीच एक जोडी चर्चेत आली आहे.

पाकिस्तानातील उमरकोट येथील सोनगढ भागातील शिवदान सिंग सोढा यांची नात नीतूराज (Neeturaj Sodha) हिचा विवाह राजस्थानमधील पिलीबंगा येथील ठाकूर किशोर शेखावत यांचा मुलगा उदयवीर सिंह (Udaiveer Singh) याच्याशी झाला. या शाही विवाह सोहळ्यानंतर पाकिस्तानची मुलगी भारताची सून (Bride From Pakistan) बनली आहे. त्यामुळं या लग्नाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

जयपूरमध्ये लग्न, पिलीबंगामध्ये रिसेप्शन : हा विवाह सोहळा 11 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता रिसेप्शन पिलीबंगामध्ये आयोजित केलं जाईल. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सोनगढ भागातून आलेल्या लग्नाच्या मिरवणुकीत 50 लोकांना लग्नासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. या लग्नाशी संबंधित सर्व विधी जयपूर आणि पिलीबंगा येथे पार पडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तर राजस्थानमध्ये विवाहसोहळा पार पडल्यानंतर शेखावत कुटुंब येत्या काही दिवसांत पाकिस्तानला जाणार आहे. व्हिसाशी संबंधित औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सोनगडमध्ये विवाह सोहळा आयोजित केला जाईल.

  • दरम्यान, राजस्थानच्या पूर्वीच्या संस्थानांचे पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे संबंध आहेत. देशाच्या फाळणीपूर्वी या संस्थानांत वैवाहिक संबंध सर्रास होत होते. पण स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढले. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या लग्नाची चर्चा होणं स्वाभाविक आहे.

हेही वाचा -

  1. जोडप्यानं साखरपुडा समारंभात एकमेकांना घातलं हेल्मेट, कारण काय? पाहा व्हिडिओ
  2. 'सदाशांती'नं बांधली अनाथांची लग्नगाठ; सपना, रुपालीला मिळवून दिलं हक्काचं सासर; आधारगृहाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग - Orphan Marriage In Amravati
  3. लेकींचं लग्न पाहायचंय! आजारी वडिलांच्या सांगण्यावरून आयसीयू वॉर्डमध्ये पार अनोखा निकाह - Nikah In ICU Ward

Last Updated : Dec 13, 2024, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.