मुंबई T20 World Cup 2024 Final: राष्ट्रपती दौपदी मुर्म यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, "T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधीही हार न मानत भारतीय संघानं कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्यं दाखवलं. अंतिम सामन्यातील हा अभूतपूर्व विजय होता. शाब्बास, टीम इंडिया! तुमचा आम्हाला अभिमान आहे."
My heartiest congratulations to Team India for winning the T20 World Cup. With the never-say-die spirit, the team sailed through difficult situations and demonstrated outstanding skills throughout the tournament. It was an extraordinary victory in the final match. Well done, Team…
— President of India (@rashtrapatibhvn) June 29, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं कौतुक केलं. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, " आपला भारतीय संघ अतुलनीय कामगिरी करत टी20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. टीमच्या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतानं संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. देशातील प्रत्येक भारतीयांचं मन भारतीय संघानं जिंकलं आहे. आज 140 कोटी भारतीयांना तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे. तुम्ही खेळाच्या मैदानासह लाखो भारतीय नागरिकांचे मने जिंकली आहेत."
CHAMPIONS!
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2024
Our team brings the T20 World Cup home in STYLE!
We are proud of the Indian Cricket Team.
This match was HISTORIC. 🇮🇳 🏏 🏆 pic.twitter.com/HhaKGwwEDt
विजय खरोखर ऐतिहासिक- गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील टीम इंडियाचं अभिनंदन केलं. हा क्षण आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले "आमच्या दमदार फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनं, गोलंदाजांच्या अथक परिश्रमानं विजय मिळविला. हा विजय खरोखर ऐतिहासिक आहे."
Congratulations to world champion Team 🇮🇳.
— Amit Shah (@AmitShah) June 29, 2024
A glorious moment for our nation.
Our players put up a stellar performance throughout the #T20WorldCup with unmatched team spirit and sportsmanship. The nation swells with pride at their historic achievement.
Well done 👏#INDvSA
क्रिकेट संघाना केला देशाचा गौरव- लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत टीमचं अभिनंदन केलं. "नेत्रदीपक विश्वचषक विजयाबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सूर्या, किती छान झेल होता! रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्वाचं उदाहरण आहे. राहुल, मला माहीत आहे की टीम इंडिया तुझ्या मार्गदर्शनाला मुकणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं देशाचा गौरव केला आहे."
#𝙈𝙚𝙣𝙄𝙣𝘽𝙡𝙪𝙚 𝙢𝙖𝙠𝙚𝙨 𝙝𝙞𝙨𝙩𝙤𝙧𝙮! 𝙏𝙝𝙚 𝙩𝙧𝙤𝙥𝙝𝙮 𝙘𝙤𝙢𝙚𝙨 𝙝𝙤𝙢𝙚! 𝙂𝙤𝙤𝙨𝙚𝙗𝙪𝙢𝙥𝙨 𝙖𝙡𝙡 𝙖𝙧𝙤𝙪𝙣𝙙! 🏏🏆 🇮🇳#T20WorldCup #T20WorldCupFinal #T20WorldCupFinal2024 #India pic.twitter.com/KwMZlxJEVc
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 29, 2024
चक दे इंडिया- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील टीम इंडियाचं अभिनंदनं केलं आहे. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " दक्षिण आफ्रिका संघाला धूळ चारत प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघानं एक नेत्रदीपक विजय मिळविला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. चक दे इंडिया..."
#𝙈𝙚𝙣𝙄𝙣𝘽𝙡𝙪𝙚 𝙢𝙖𝙠𝙚𝙨 𝙝𝙞𝙨𝙩𝙤𝙧𝙮! 𝙏𝙝𝙚 𝙩𝙧𝙤𝙥𝙝𝙮 𝙘𝙤𝙢𝙚𝙨 𝙝𝙤𝙢𝙚! 𝙂𝙤𝙤𝙨𝙚𝙗𝙪𝙢𝙥𝙨 𝙖𝙡𝙡 𝙖𝙧𝙤𝙪𝙣𝙙! 🏏🏆 🇮🇳#T20WorldCup #T20WorldCupFinal #T20WorldCupFinal2024 #India pic.twitter.com/KwMZlxJEVc
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 29, 2024
संपूर्ण संघाच्या कार्याला सलाम- "सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा तसचं ICC T20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजय, म्हणत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अभिनंदन केलंय. " ही एक अविस्मरणीय कामगिरी भारतीयांच्या हृदयात नेहमी राहील. भारतीय क्रिकेट संघाची अतुलनीय कामगिरी त्यांची अफाट क्षमता आणि प्रयत्न दर्शवते. रोहित शर्माची कर्णधारपदासाठीची भूमिका आणि संपूर्ण संघाच्या कार्याला सलाम, पुन्हा एकदा अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा." माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विराट कोहली, सुर्यकुमार, रोहित शर्मा आणि भारतीय संघाला टॅग करत अभिनंदन केले.
Last over Thriller ! Proud Moment after 13 long years of wait. Kudos to @ImRo45, @imVkohli, and what a catch by @surya_14kumar!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2024
Congratulations @teamIndia
ग्रेट टीम इंडिया...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2024
आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर...
दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ...
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. भारतीय संघाने समोर ठेवलेले १७७… pic.twitter.com/7e04cozE7w
देश या विजयानं भारावून गेला- उममुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. त्यांनी म्हटले, " भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघानं टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयानं भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं केलेली कामगिरी जगज्जेत्या सारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसंच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो."
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा 🇮🇳
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 29, 2024
Thrilling, Scintillating, Amazing, Massive !
India's Remarkable Victory at the ICC T20 World Cup! 🏏🏆
India Wins the T20 World Cup!!!!
It’s a memorable achievement that the nation will always cherish in their hearts. The incredible… pic.twitter.com/XSi5X6u3LD
हेही वाचा