श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) India Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी 'इंडिया आघाडी'ला आणखी एक झटका बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं आहे. ते श्रीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यामुळं इंडिया आघाडीत पुन्हा एकदा फूट पडल्याचं दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'इंडिया आघाडी'ला झटका देत भाजपासोबत सरकार स्थापन केलंय.
"आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळं नॅशनल कॉन्फरन्स आपल्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहे," - फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का : लोकसभा निवडणुकीबाबत जम्मू-काश्मीरमधील आघाडीचा पक्ष असलेल्या 'नॅशनल कॉन्फरन्स'नं घेतलेल्या भूमिकेमुळं पीडीपीसह (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीरमधील पाच जागांवर सत्ताधारी पक्षाला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची गरज होती. मात्र, अशा निर्णयामुळं इंडिया आघाडी कमकूवत होत असल्याचं दिसतंय. जनता पक्ष. 'नॅशनल कॉन्फरन्स तसंच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी काँग्रेसनं स्थापन केलेल्या भारत आघाडीचे घटक पक्ष आहेत.
जम्मू-काश्मीरमधील आघाडीसाठी धक्का : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी इंडिया आघाडीच्या सर्व बैठकांना हजेरी लावली होती. तथापि, फारूक अब्दुल्ला यांचं वक्तव्य जम्मू-काश्मीरमधील आघाडीसाठी धक्का मानलं जात आहे. बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेल्या जम्मू तसंच अनंतनाग-राजौरी मतदार संघावर भाजपाला दोन जागा जिंकण्याची आशा आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचं सत्तेला प्राधान्य : फारुख अब्दुल्ला यांच्या आगोदर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका देत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्या विधानानं नाराज झालेल्या पीडीपी नेत्यानं 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, "नॅशनल कॉन्फरन्सनं" जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या हितापेक्षा नेहमीच सत्तेला प्राधान्य दिलं आहे."
धर्मनिरपेक्ष पक्षांची युती लोकांच्या हिताची : "जम्मू-काश्मीरमधील धर्मनिरपेक्ष पक्षांची युती संपूर्ण प्रदेशातील लोकांच्या हितासाठी होती. परंतु नॅशनल कॉन्फरन्सनं नेहमीच लोकांच्या हितापेक्षा सत्तेला प्राधान्य दिलं आहे," असं एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. पीडीपीला अनंतनाग-राजौरी जागेवर नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करायची होती. या जागेवर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती निवडणूक लढवणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सनं श्रीनगर, कुपवाडाच्या जागांवर पीडीपीसोबत आघाडी करून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा होती. काँग्रेसला जम्मूच्या दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स तसंच पीडीपीचा पाठिंबा हवा होता.
हे वाचलंत का :
- शरद पवारांच्या मनाविरुद्ध कृती करणं म्हणजे पक्ष सोडणं नाही- विधानसभा अध्यक्ष
- इलेक्टोरल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही वाचवणारा, विरोधी पक्षानं केलं निर्णयाचं स्वागत
- आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून तो काढून घेतात यावर काय अपेक्षा करायची - सुप्रिया सुळे