ETV Bharat / bharat

होळीच्या दिवशीच मोबाईलनं केला घात; स्फोटात चार चिमुकल्यांचा मृत्यू, आई-वडील गंभीर - Mobile Blast

Mobile Blast : मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. पण, याच मोबाईलमुळं आपला जीव जाऊ शकतो याची कल्पनाही कोणीच करत नसेल. मात्र, याच मोबाईलनं चार जणांचा मृत्यू झालाय. वाचा सविस्तर बातमी....

Mobile Blast
मोबाईलचा स्फोट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 4:23 PM IST

मेरठ (उत्तर प्रदेश) Mobile Blast : मोबाईल चार्जरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं घराला आग लागली असल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडलीय. या घटनेत चार मुलांचा मृत्यू झालाय, तर आई-वडिलांची तब्येत सध्या गंभीर आहे. या घटनेनं मोबाईलचा वापर किती प्रमाणात करावा याचं गांभीर्य येणं गरजेचं आहे. एका मोबाईलमुळं आई-वडिलांनी आपल्या पोटच्या चार मुलांना गमावलंय.

मेरठमधील घटना : मेरठ जिल्ह्यातील पल्लापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत शनिवारी रात्री मोबाईल चार्जरमधून निघालेली ठिणगी चार मुलांच्या मृत्यूचं कारण बनलीय. मोबाईल चार्जरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं घराला आग लागली. या घटनेत पती, पत्नी आणि चार मुले गंभीररित्या भाजली गेली. यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील चार मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर त्यांच्या पालकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मोबाईल स्फोटात चार मुलांचा मृत्यू : जानी आणि बबिता हे जोडपे आपल्या चार मुलांसह मुजफ्फरनगर येथील सिखेडा भागात राहते. सारिका, निहारिका (वय -8), गोलू (वय - 6) आणि कालू (वय - 5) अशी त्यांच्या चार मुलांची नावे आहेत. जानी हे रोजंदारी मजूर आहे. होळीमुळं हे कुटुंब एकत्र घरी बसलं होतं. संध्याकाळी जानी आणि त्याची पत्नी बबिता होळीचे पदार्थ बनवत होतं. तर चारही मुलं दुसऱ्या खोलीत होती. मोबाईल चार्जिंगसाठी ठेवला होता. अचानक चार्जरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठा स्फोट झाला, त्यामुळं संपूर्ण खोलीला आग लागली.

आगीत चारही मुलं जळून खाक : या आगीनं पडद्यासह पलंगालाही वेढलं होतं. यानंतर आगीनं उग्र रूप धारण केलं. हे पाहून जानी आणि बबिता खोलीच्या दिशेने धावले. मुलांना वाचविण्याचा प्रयत्न करू लागले. यामध्ये जानी आणि बबिता गंभीर जखमी झाले. मोठ्या मुलीनं आपल्या भावंडांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिन्ही मुलं आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. आगीत घर जळताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी बचावासाठी धाव घेतली. यानंतर या घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. सर्व गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयानं चारही मुलांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.

होळीचा आनंद आगीत भस्मसात : जानी यांनी सांगितलं की, ''आग लागली तेव्हा ते बबिताबरोबर किचनमध्ये होळीसाठी करंजी बनवत होते. मुलं खोलीत बसून खेळत होती. अचानक खोलीत मोठा स्फोट झाला. त्यांनी खोलीकडे धाव घेतली तेव्हा त्यांना धूर निघत असल्याचं दिसलं . मुले आगीच्या ज्वालांनी वेढलेली होती. अचानक आग कशी लागली हे समजू शकले नाही.'' या प्रकरणी पल्लापुरम पोलीस स्टेशनचे प्रभारी मुनेश सिंह यांनी सांगितलं की, ''मुले 70 टक्के भाजली होती. तर पती-पत्नीही 50 टक्के भाजले होते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे."

हेही वाचा :

  1. ईडीच्या कोठडीतून दिल्ली सरकारचा कारभार सुरू, केजरीवाल यांनी उपराज्यपालांचा उल्लेख करत काढला 'हा' आदेश - Arvind Kejriwal News
  2. अरुणाचल प्रदेश म्हणजे भारतीय अखंडतेचं प्रतीक; परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला फटकारलं, म्हणाले जगाची दिशाभूल करू नका! - EAM S Jaishankar
  3. काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार भाजपात, 'या' राज्यात कोसळणार काँग्रेस सरकार? - Congress MLA joined BJP

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.