ETV Bharat / bharat

हिंदू धर्म हा भीती, द्वेष पसरवत नाही, मात्र भाजपावाले तेच करतात: राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात - Rahul Gandhi in Lok Sabha - RAHUL GANDHI IN LOK SABHA

Rahul Gandhi in Lok Sabha - राहुल गांधी यांनी आज लोकसभेत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सत्ताधारी नेते आणि प्रतिनिधी खोट्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतात अशा आशयाचं मत मांडलं. हिंदू धर्म हा कधीच भीती आणि द्वेष पसरवत नसल्याचं सांगून भाजपानं आजपर्यंत हेच केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी लोकसभा
राहुल गांधी लोकसभा (संसद टीव्ही)
author img

By PTI

Published : Jul 1, 2024, 4:54 PM IST

Updated : Jul 1, 2024, 7:23 PM IST

नवी दिल्ली Rahul Gandhi in Lok Sabha- लोकसभेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, हिंदू धर्म हा भीती, द्वेष आणि खोटेपणा पसरवण्यास शिकवत नाही. संसदेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी बोलत होते. त्याचवेळी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या भाषणादरम्यान हस्तक्षेप केला. "भाजपा आणि आरएसएस हे संपूर्ण हिंदू समाज नाहीत" असं गांधींनी त्यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं.

निर्भयतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि शीख धर्माचा हवाला देऊन सर्व धर्म धैर्याबद्दल बोलतात यावर राहुल गांधी यांनी जोर दिला. राज्यघटनेवर आणि भारताच्या मूलभूत कल्पनेवर पद्धतशीर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला. लाखो लोकांनी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या कल्पनांना निवडणुकीत विरोध केला आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्याविरोधात 20 हून अधिक प्रकरणे चालवली आहेत. माझं घर काढून घेण्यात आलं, ईडीने 55 तासांची चौकशी केली. या आव्हानांना न जुमानता संविधानाच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्न केल्याबद्दल मला अभिमान वाटतो." राहुल गांधी यांनी भाजपाच्यावर टीका करताना विविद आरोपही केले, ते म्हणाले, "भाजपचे लोक आता माझ्यानंतर 'जय विधान' ची पुनरावृत्ती करत आहेत हे छान वाटतंय,". राहुल गांधींनी विरोधी पक्षात असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. विरोधी पक्षात असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आमच्यासाठी सत्तेपेक्षाही काहीतरी अधिक आहे, ते म्हणजे सत्य आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या भाषणादरम्यान, राहुल गांधींनी भगवान शिवाचे चित्र दाखवले, ज्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना आठवण करून दिली की नियम सभागृहात फलक प्रदर्शित करण्यास परवानगी देत ​​नाहीत. गांधींनी पुनरुच्चार केला की इस्लाम आणि शीख धर्मासह सर्व धर्म धैर्य आणि निर्भय असण्याच्या महत्त्वावर जोर देतात, ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना खऱ्या हिंदुत्वाविषयी भाष्य केलं. ते म्हणाले,की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते चोवीस तास “हिंसा आणि द्वेष” करत आहेत, यावर सत्ताधारी सदस्यांनी निषेध नोंदवला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावर राहुल गांधींनी मात्र आपण भारतीय जनता पक्षाबद्दल बोलत असल्याचा पलटवार केला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) किंवा मोदी हे संपूर्ण हिंदू समाज नाहीत, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे स्वतःला हिंदू म्हणून अभिमान बाळगणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेत्याने सभागृहाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. शाह यांनी आणीबाणी आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलींबद्दल सांगून गांधींना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, काँग्रेसनं देशात "दहशत" पसरवली असताना त्यांना अहिंसेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.

हेही वाचा..

नीट पेपर लिक प्रकरण : विरोधकांचा नीटवरुन लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक - Lok Sabha Session 2024

Last Updated : Jul 1, 2024, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.