शिमला Himachal Pradesh Politics Crisis : राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात हिमाचल प्रदेशातील एका जागेवर झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले, तर सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा क्रॉस व्होटिंगमुळं पराभव झाला. हिमाचल प्रदेशात भाजपाला बहुमत नव्हतं. पण काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केलं. याशिवाय तीन अपक्ष आमदारांनीही काँग्रेसला साथ दिली नाही. त्यामुळं काँग्रेस आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली. राज्यसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमधील समान मतांमुळं चिठ्ठी काढून विजयी किंवा पराभूत ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, यातही काँग्रेसला नशिबानं साथ दिली नाही अन् भाजपाचा विजय झाला.
भाजपाची मतदान विभाजनाची मागणी : हिमाचल विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान, काँग्रेस सरकारनं आपल्या आमदारांचा विश्वास गमावल्याचा दावा भाजपानं केलाय. जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आमदारांनी राज्यपालांकडं मतदान विभाजनाची मागणी केलीय. मात्र, जयराम ठाकूर यांनी अद्याप बहुमत चाचणीच्या चर्चेचं खंडन केलंय. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर म्हणाले की, "या सरकारनं बहुमत गमावलं असून आता आमदारांना धमकावण्याचं काम केलं जातंय."
भाजपाचे 14 आमदार निलंबित : हिमाचल विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात आज गदारोळात झाली होती. कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन सिंह सभागृहात बोलत होते. हर्षवर्धन म्हणाले की, "भाजपानं अध्यक्षांबरोबर गैरवर्तन केलंय. जयराम ठाकूर, जनक राज, रणवीर निक्का इत्यादींची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. अध्यक्षांनी सभागृहात ठरावाचं वाचन करुन भाजपा सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर भाजपाचे सदस्य सभागृहाच्या बालकणीत आले. त्यानंतर सभागृहात अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली आणि प्रचंड गदारोळ पाहता अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिला. भाजपाच्या 14 आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्याचे आदेश अध्यक्षांनी देत मार्शलला भाजपा सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले."
हेही वाचा :