चंदीगड Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. या आमदारांबाबतचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी घेतलाय. काँग्रेसच्या या सहा आमदारांवर आज विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी कारवाई केली. त्यांना अपात्र ठरवलं आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी विधानसभा अध्यक्षांकडं सहा आमदारांनी क्रॉस व्होट केल्याची याचिका दाखल केली होती.
पक्षांतरविरोधी कायदा या आमदारांना लागू होत नाही : हिमाचल प्रदेशमध्ये राजकारण तापल्यानं चांगलाच गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी दोन वेळा या आमदारांच्या बाबत सुनावणी घेतल्यानंतरही हे प्रकरण तापलं. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं या आमदारांवर कारवाई करण्यासाठी न्यायाधिकरणात काँग्रेसनं धाव घेतली होती. या न्यायाधिकरणाचे अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष असतात. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी आज सकाळी निकाल दिला. भाजपा नेते आणि ज्येष्ठ वकील सतपाल जैन यांनी सहा आमदारांच्या वतीनं न्यायाधिकरणासमोर बाजू मांडली. "पक्षांतरविरोधी कायदा त्या आमदारांना लागू होत नाही," असं त्यांचं मत होतं. 6 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष घेणार पत्रकार परिषद : आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं हिमाचल प्रदेशातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी या प्रकरणी बुधवारी निकाल राखून ठेवला होता. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी आज निकाल दिला. विधानसभा सचिवालयातून आज सकाळी 11 वाजता विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना या सहा आमदारांना अपात्र ठरवल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा :