ETV Bharat / bharat

हाथरस सत्संग चेंगराचेंगरी; भोलेबाबा दुधानं करायचा अंघोळ, त्याच दुधाची खीर बनवून वाटला जायचा प्रसाद - Hathras Satsang Stampede

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 10:58 AM IST

Hathras Satsang Stampede : हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आता हा भोलेबाबा दुधानं अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भक्तांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला. भोलेबाबाच्या गावातील नागरिकांनी याबाबतचा खुलासा केला.

Hathras Satsang Stampede
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

हाथरस सत्संग चेंगराचेंगरी (ETV Bharat)

लखनऊ Hathras Satsang Stampede : हाथरस सत्संगात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 121 भाविकांचा बळी गेला. या अपघाताला जबाबदार असलेला सूरजपाल उर्फ भोलेबाबा हा अद्यापही फरार आहे. सूरजपाल उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत आता एक-एक खुलासे होत आहेत. भोलेबाबा उर्फ सूरजपाल हा दुधानं अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादाय प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनं सांगितला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस सूरजपाल उर्फ भोलेबाबाचा शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे.

भोलेबाबा दुधानं करायचा अंघोळ त्याच दुधाची बनायची खीर : बहादूर नगर इथल्या एका ग्रामस्थानं सांगितलं की, "पूर्वी भोलेबाबाला दुधानं आंघोळ घालत असत. त्याच दुधापासून खीर बनवली जायची. यानंतर ही खीर भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली. ही बाब गावातील नागरिकांना कळताच त्यांनी विरोध केला. हा प्रकार उजेडात आल्यानंतर नागरिकांनी बाबांपासून अंतर ठेवलं," असंही या गावकऱ्यानं सांगितलं. "बहादूर नगरच्या या आश्रमात शेवटचा सत्संग 2014 मध्ये झाला. यानंतर ना सत्संग होतो ना भोलेबाबा या आश्रमात येतात. मागील 10 वर्षात भोलेबाबा अधूनमधून त्यांच्या गावात येतात. आजही मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी आश्रमात होत असून बाविक मोठ्या भक्तीभावानं दर्शन घेतात. मात्र हाथरस इथं चेंगराचेंगरी झाल्यानंतर भोलेबाबा यानं मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची प्रकृती विचारायला हवी होती," असं ग्रामस्थांचं मत आहे.

गावात भोलेबाबाचा अलिशान आश्रम : हाथरस सत्संग चेंगराचेंगरी झाल्यानंतर सूरजपाल उर्फ भोलेबाबा फरार झाला. भोलेबाबा हा कासगंज जिल्ह्यातील पटियाली तहसीलमधील बहादूर नगर गावातील आहे. या बहादूर नगर गावात भोलेबाबाचा अलिशान आश्रम आहे. या आश्रमाच्या दारात फिकट गुलाबी रंगाचा गणवेश परिधान केलेले सेवेदार तैनात आहेत. भोलेबाबा इथल्या आश्रमात कधी येत नाही, मात्र भोलेबाबाचा दरबार इथं बाविकांनी भरलेला असतो. हातरसमधील सिंद्रराव पोलीस स्टेशन परिसरातील फुलराई गावात मंगळवारी सूरजपाल उर्फ ​​भोलेबाबा याच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्संगात लाखो भाविकांनी हजेरी लावली. मात्र सत्संग संपल्यानंतर भोलेबाबा निघाताच त्याच्या चरणी जाण्यासाठी भाविकांनी मोठी गडबड केली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी आहेत.

हेही वाचा :

  1. हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede
  2. ''पाण्यामुळं महिला घसरून पडल्या...'', सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं सत्य - Hathras Satsang Stampede
  3. गुप्तचर विभागात नोकरी ते धार्मिक सत्संग; कोण आहेत हे भोले बाबा? 116 जणांच्या मृत्यूनंतर काढला पळ - Hathras Stampede Incident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.