चंदीगड Haryana Political Crisis : हरियाणात भाजपा आणि जेजेपी यांची युती फिस्कटल्यानं महोरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी नायब सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे हरियाणा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज सकाळी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री नायब सैनी यांना बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. बहुमत चाचणी होत असल्यानं मुख्यमंत्री नायब सैनी यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.
हरियाणा विधानसभेत आज होणार बहुमत चाचणी : मंगळवारी हरियाणा राज्य मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या शपथग्रहण सोहळ्यात पाच मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रणजीत सिंह चौटाला, बनवारी लाल आणि जेपी दलाल यांचा समावेश आहे. या अगोदरच्या महोरलाल खट्टर यांच्या मंत्रिमंडलातही हे पाच जण मंत्री म्हणून कार्यरत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहलाल खट्टर यांनी कोणताही भेदभाव न करता काम केलं आहे. सरकारच्या योजना नियोजनबद्ध पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
सरकारला 48 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी "आमचं मंत्रिमंडळ माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आभार आहे. मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणाला नवी दिशा दिली. त्यांचा कार्यकाळ म्हणजे सुशासनाचे अतिशय चांगलं उदाहरण आहे. कोणताही भेदभाव न करता, त्यांनी काम केल्यानं राज्यात विकासकामं झाली आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणा विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. आमच्या सरकारला 48 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिेब्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द करण्यात आलं आहे."
हेही वाचा :