ETV Bharat / bharat

टायर फुटल्यानंतर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली कार; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू - Hapur Road Accident - HAPUR ROAD ACCIDENT

Hapur Road Accident : मुरादाबाद दिल्ली महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. टायर फुटल्यानं डिव्हाडर तोडून कार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा घटनास्थळावरचं मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Hapur Road Accident
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 11:10 AM IST

लखनऊ Hapur Road Accident : टायर फुटल्यानंतर डिव्हायडर तोडून ट्रकला कार धडकून तब्बल 6 जण ठार झाले. ही दुर्दैवी घटना मुरादाबाद दिल्ली महामार्गावर हापूर इथं सोमवारी रात्री उशीरा घडली. या अपघातात कारमध्ये अडकलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. मृतांची अद्यापही ओळख पटली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या कारमधील प्रवासी मुरादाबादकडून दिल्लीकडं जात होते. या घटनेत एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Hapur Road Accident
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)

डिव्हायडर तोडून कारची ट्रकला धडक : मुरादाबादकडून दिल्लीला जाणारी कार गढ पोलीस ठाण्याच्या परिसरात अनियंत्रीत झाली. त्यामुळे कार डिव्हायडर तोडून समोरुन येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. ही घटना सोमवारी रात्री उशीरा बृजघाट टोल प्लाझाजवळ घडली. या भीषण अपघातात कारमधील सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह काढले बाहेर : बृजघाट टोल प्लाझाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी कारमधील प्रवाशांना बचावण्याचा प्रयत्न केला. मात्र कारमधील 6 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे मृतदेह कारमध्ये अडकलेल्या स्थितीत होते. यावेळी घटनास्थळावर एकजण गंभीर जखमी होता, त्याला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तर इतर प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे. मुरादाबाद दिल्ली महामार्गावर भीषण अपघातात सहा नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. Gorakhpur Kushinagar Highway Accident : गोरखपूर कुशीनगर महामार्गावर उभ्या बसला ट्रकची धडक; सहा प्रवाशांचा मृत्यू
  2. UP Car Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा चक्काचूर.. चार जण जागीच ठार..
  3. उत्तरप्रदेश : लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.