ETV Bharat / bharat

"कॉलेजची पदवी घेऊन काहीही होणार नाही, पंक्चरचं दुकान उघडा"; भाजपा आमदराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला - MLA Pannalal Shakya on degree

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 10:44 PM IST

MLA Pannalal Shakya on Degree : गुना येथील पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या भाजपा आमदारानं विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला. हा सल्ला ऐकून तुम्ही देखील धक्क होताल.

MLA Pannalal Shakya
आमदार पन्नालाल शाक्य (ETV Bharat)

भोपाळ MLA Pannalal Shakya on degree : मध्य प्रदेशातील गुना येथील भाजपा आमदाराचं एक अजब विधान सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. भाजपाचे आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले, "कॉलेजची पदवी तुम्हाला मदत करणार नाही, मोटारसायकल दुरुस्तीचं म्हणजेच पंक्चरचं दुकान उघडा जेणेकरुन तुमचा उदरनिर्वाह होईल." पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन समारंभात शाक्य यांनी हे अजब वक्तव्य केलंय. यावेळी ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी रिबीन कापून महाविद्यालयाचं उद्घाटन केलं.

आमदार पन्नालाल शाक्य (ETV Bharat)

नालंदा विद्यापीठाबाबत दिली माहिती : या कार्यक्रमात बोलताना आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले, "मी जे काही बोलेन ते विज्ञान आणि गणिताचं सूत्र घेऊन सांगेन. समजून घ्या की ही महाविद्यालयं म्हणजेच शैक्षणिक संस्था आहेत. हे कॉम्प्रेसर हाऊस नाही, ज्यामध्ये डिग्रीनुसार हवा भरता येते आणि प्रमाणपत्र देऊन जाते. खरं तर शैक्षणिक संस्था म्हणजे ज्यात 'धाई अक्षर पढे सो पंडित होय, पोथी पढे-पढे जगमुआ पंडित भय ना कोई' नालंदा विद्यापीठ होते, ज्यात 12 हजार विद्यार्थी आणि 1200 शिक्षक होते. या महाविद्यालयात 18 हजार विद्यार्थी आहेत. 11 जणांनी नालंदा विद्यापीठ जाळलं होतं. 12 हजार विद्यार्थी फक्त मी एकटा काय करणार याचा विचार करत राहिले. त्यामुळं भारताचं ज्ञान संपलं आहे."

पर्यावरण प्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला : तसंच आमदार पुढं म्हणाले, "सर्वप्रथम, आपलं शरीर ज्या पाच घटकांपासून बनलं आहे. पाणी, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी या पाच घटकांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. आज संपूर्ण भारतात पर्यावरणाबाबत चिंता आहे. पाण्याची आणि प्रदूषणाची काळजी आहे, पण एकही उत्तम सूत्र समोर येत नाही, हजारो झाडं लावली तर किती दिवस पर्यावरणाचं रक्षण होणार? एका व्यक्तीनं भूकबळी झाली आहे का? नाही, मोटारसायकल दुरूस्तीचं दुकान उघडा जेणं करुन तुम्ही किमान तुमची उदरनिर्वाह करु शकाल."

हेही वाचा :

  1. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारची महिलांना खैरात; 25 लाख महिलांना करणार साडी वाटप
  2. मध्य प्रदेशात भाजपाचा दे धक्का! शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं, वाचा नवीन मुख्यमंत्री कोण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.