नवी दिल्ली Arvinder Singh Lovely joins BJP : काँग्रेसचे माजी नेते अरविंदर सिंग लवली यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यांनी मागच्या आठवड्यात रविवारी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मी राजीनामा दिला मात्र, मी कोणात्याच पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. मात्र, त्यांनी घूमजाव करत आज भाजपात प्रवेश केला आहे. अरविंदर सिंग लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेसच्या अन्य दोन नेत्यांनी राजीनामे दिले होते. माजी आमदार नीरज बसोया तसंच नसीब सिंह यांनी दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यातील युतीला विरोध करत पक्षाचा राजीनामा दिला होता. या दोन नेत्यांसोबत राजकुमार चौहान यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
लवलीनी का दिला राजीनामा? : राजीनामा दिल्यानंतर अरविंदर सिंग लवली यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितलं की, मी माझ्यासाठी राजीनामा दिलेला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मी हा राजीनामा दिला आहे. इतर कोणत्याही पक्षात मी जाणार असं त्यावेळी ते म्हणाले होते.
'आप'च्या युतीमळं नाराज : अरविंदर सिंग लवली यांनी पद सोडल्यानंतर आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, दिल्ली काँग्रेसचा आप पक्षासोबतच्या युतीच्या विरोधात आहे. मात्र, काँग्रेस हायकमांडनं आमचं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर त्यांनी 'आप'शी युती करण्यास मान्यता दिली. अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना दिलेल्या तिकिटांवर टीका केली होती. ते दिल्ली काँग्रेससाठी अनोळखी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या त्यांच्या राजीनामा पत्रात त्यांनी दिल्लीचे प्रभारी दीपक बाबरिया हे आम्ही घेतलेले निर्णय थांबवत असल्याचा आरोप केला होता. लवली यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं होतं की, दिल्ली काँग्रेस युनिट आपसोबतच्या युतीच्या विरोधात आहे. आम आदमी पार्टीचे अर्धे कॅबिनेट मंत्री सध्या तुरुंगात आहेत. तरीही दिल्लीत काँग्रेसनं आपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर, काँग्रेसच्या धोरणांची माहिती नसलेल्या दोन नेत्यांना कन्हैया कुमार तसंच उदित राज तिकीट देण्यात आलं.
हे वाचलंत का :
- दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा दिला राजीनामा, काय केले आरोप? - Arvinder Singh Lovely resigns
- कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार - Devendra Fadnavis On Onion Exports
- काँग्रेसची सत्ता आल्यास मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल; राहुल गांधींचं आश्वासन - Lok Sabha election