ETV Bharat / bharat

नेपाळमधील पावसामुळं बिहारमध्ये पूर; कोसीनं मोडला 56 वर्षांचा विक्रम, 20 जिल्ह्यांना पुराचा धोका - FLOOD IN BIHAR - FLOOD IN BIHAR

Flood In Bihar : नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं बिहारमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. एकीकडं कोसी बॅरेजमधून रेकॉर्डब्रेक पाणी सोडण्यात येत आहे. तर दुसरीकडं नेपाळमध्ये पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत आहे.

flood in bihar due to rising water in kosi barrage from nepal
नेपाळमधील पावसामुळं बिहारमध्ये पूर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 11:38 AM IST

पाटणा Flood In Bihar : नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोसीमध्ये पाणी सतत वाढत आहे. रविवारी (29 सप्टेंबर) पहाटे 5 वाजेपर्यंत कोसी बॅरेज वीरपूर येथून 6,61,295 क्युसेक पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे जलविसर्गाचा 56 वर्षांचा विक्रम मोडला गेला. 1968 नंतर आता कोसीमध्ये सर्वाधिक पाणी सोडण्यात आलं आहे.

नेपाळमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळं कोसी नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळं शनिवारी (28 सप्टेंबर) संध्याकाळी कोसी बॅरेज पूल पाण्याखाली गेला. तसंच यामुळं बिहार सरकार आणि नेपाळ सरकारचे कामकाज ठप्प झालंय.

कोसीचे 56 दरवाजे उघडले : जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, नेपाळ विभागातील कोसी नदीच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झालाय. त्यामुळं कोसीतील पाण्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. नेपाळनं कोसी आणि गंडक बॅरेजमधून 10.5 लाख क्युसेक पाणी सोडलं आहे. नेपाळ विभागात पाण्याचा दाब वाढल्याने कोसी बॅरेजचे 56 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शनिवारपासून सोडलं जातय पाणी : गेल्या 24 तासांत कोसीच्या पाणीपातळीत सुमारे 4 लाख क्युसेकनं वाढ झाली आहे. जलसंपदा विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत नेपाळच्या बराह भागात 4 लाख 45 हजार 550 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. तर कोसी बॅरेजमधून 5 लाख 21 हजार 455 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा विसर्ग वाढून 5, 67, 760, रात्री 8 वाजता तो 5 लाख 90 हजार 385 क्युसेक आणि रात्री 10 वाजता विसर्ग वाढून 6,01,600 क्युसेक झाला आहे.

नेपाळमध्ये पूर : नेपाळच्या फतुहा पुलाजवळील लालबकेया नदीचा बांध फुटलाय. त्यामुळं भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात पूर आलाय. त्याचा परिणाम बिहारमध्येही दिसून येईल. नेपाळला लागून असलेल्या भारतीय हद्दीत पाणी शिरू लागले आहे. कोसी आणि गंडक, बिहारमधील गोपालगंज, सारण, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी, शिवहार, समस्तीपूर, किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार, सुपौल, सहरसा, मधेपुरा, मधुबनी, खरियांग, दारभंग या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर भागलपूर जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार, 66 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा -

  1. VIDEO : गोंदियात पावसाचा कहर; इमारत कोसळल्यानं मायलेकाचा मृत्यू, नदीत डिझेल टँकर गेला वाहून - Heavy Rain in Gondia
  2. गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर, गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली; पाहा व्हिडिओ - Nashik Godavari River Flood
  3. गरोदर महिलेला कळा सहन होईनात, नदीला आला महापूर, गावात रस्ता नाही...तहसीलदार बनले 'देवदूत' - Pregnant Woman Rescue Gadchiroli

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.