ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय; लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची केली घोषणा - Five New District - FIVE NEW DISTRICT

Five New District : केंद्रीय गृह मंत्रालयानं लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत.

Etv Bharat
अमित शाह, नरेंद्र मोदी (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 6:43 PM IST

नवी दिल्ली Five New District : केंद्र सरकारनं लडाखसाठी महत्त्वाचा निर्णय घेत नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी लडाख संदर्भात सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

लडाखमधील लोकांना नवीन संधी मिळणार : लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल माहिती देताना गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयानं केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल. लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.

नरेंद्र मोदींनी केलं कौतुक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले, "लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक गतीमान होणार आहे. लडाखच्या समृद्धीच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे. या भागात आता अधिक लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना अधिक संधी मिळतील."

माजी खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनीही सरकारच्या नवीन जिल्ह्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "नवीन जिल्हे निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. मोदी सरकार लडाखच्या लोकांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करत आहे."

एकूण सात जिल्हे होणार : 5 ऑगस्ट 2019 पर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा भाग होता, परंतु कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. लडाखमध्ये सध्या लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतःच्या स्वायत्त जिल्हा परिषदा आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण सात जिल्हे असतील.

भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं सोमवारी पहिल्या 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र, दोन तासांनंतर भाजपाकडून ही यादी मागे घेण्यात आली. यानंतर भाजपानं पहिल्या टप्प्यासाठी केवळ 15 उमेदवारांची नावं जाहीर केली. तिथे 19, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा

  1. "नव्या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद", महिलांवरील अत्याचारावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला संताप - PM Modi On Women Crime
  2. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजनेला मंजूरी, २३ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ - NPS
  3. नेपाळमध्ये नदीत बस कोसळून जळगावमधील 27 यात्रेकरुंचा मृत्यू, रक्षा खडसे उद्या जखमींची घेणार भेट - Indian Bus Plunges River in Nepal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.