आग्रा : पतीशी भांडण करुन आग्र्यातील हॉटेलमध्ये थांबलेल्या महिलेवर 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या नराधमांनी बलात्कार करतानाचे व्हिडिओ बनवून त्या माध्यमातून पीडितेला ब्लॅकमेल करुन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं, असा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी पीडित महिलेनं नराधमाच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पतीला जाऊन आपबिती सांगितली. त्यामुळे सामूहिक बलात्कार करुन महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या हॉटेलचालक आणि त्याच्या साथिदारांसह दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा हस्तांतरित करण्यात आला असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
पतीशी भांडण केल्यानंतर पीडिता आली होती आग्र्यात : फिरोजाबाद इथली पीडिता पतीबरोबर भांडण झाल्यानंतर जुलै महिन्यात आग्र्यात आली होती. आग्रा इथल्या एका हॉटेलमध्ये ती राहत होती. पतीबरोबर भांडण केल्यानंतर ती रागाच्या भरात रागाच्या भरात ती ताजगंज येथील हॉटेलमध्ये जुलै महिन्यात थांबली. मात्र या हॉटेलला कोणतंच नाव नव्हतं, हॉटेलचालक अनिल यादव आणि त्याचे साथीदारांनी हे हॉटोल चालवलं होतं.
कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ दिल्याचा पीडितेचा आरोप : या हॉटेलचा मालक अनिल यादव आणि त्याचा साथिदार रुस्तम यादव आणि रमेश यांनी या महिलेच्या असहायतेचा फायदा घेतला. त्यांनी महिलेला अमली पदार्थ मिश्रित कोल्ड्रिंक प्यायला लावलं. मात्र महिलेचं भान हरपल्यानंतर तिघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केला. सामूहिक आत्याचाराचा या नराधमांनी अश्लिल व्हिडिओ बनवला, असा आरोपही पीडितेनं केला. या व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं. हॉटेलमध्ये ओलीस ठेवण्यात आलं. यावेळी हॉटेलमधील दोन ग्राहक आनंद पोरवाल आणि वैभव पोरवाल यांनीही बलात्कार केला. हॉटेलचालकानंही त्याच्या घरात तीन महिने ओलीस ठेवलं, असा आरोपही पीडितेनं तक्रारीत केला.
सुटका करुन घेत पीडिता निसटली : हॉटेल मालकाच्या तावडीतून पीडिता 9 ऑक्टोबरला कशीतरी निसटली. यानंतर पीडितेनं पतीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पतीनं तिला सोबत घेत तुंडला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सहायक पोलीस आयुक्त सय्यद अरीब अहमद यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "या प्रकरणी तुंडला पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजगंजचं आहे. आता प्रकरणा वर्ग करण्यात आलं आहे. पुरावे गोळा करून पुढील कारवाई केली जाईल. पीडित तरुणी अद्याप काहीही सांगण्यास तयार नाही. त्यांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल."
हेही वाचा :