बंगळुरू FIR Against CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) घोटाळ्यात मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MUDA घोटाळ्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्यासह तिघांविरोधात लोकायुक्तांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकसह देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: On the cases being investigated by the Lokayukta and the allegations being levelled against them, Upa Lokayukta Justice B Veerappa (Retd) says, " we are doing our job...there is no question of changing our pattern. we have to go by the procedure. we… pic.twitter.com/NvOkUvLCRD
— ANI (@ANI) September 27, 2024
कर्नाटकचे मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा : म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर तिघांविरुद्ध म्हैसूर लोकायुक्तांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकायुक्तांकडं प्रकरण क्रमांक 11/2024 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लोकायुक्तांनी या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी बी एन पार्वती यांना क्रमांक दोनच्या आरोपी करण्यात आलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिद्धरामय्या यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांना आरोपी करण्यात आलं आहे. त्यांच्यासह जमीन विकणारे देवराजू यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: On MUDA case, Upa Lokayukta Justice B Veerappa (Retd) says, " there is no (intentional delay). there are 20,000 cases pending. we are doing our job. there is no question of delay. it will take time. there are so many procedures that we cannot deviate… pic.twitter.com/tfZjhJyEF5
— ANI (@ANI) September 27, 2024
काय आहे MUDA जमीन घोटाळा प्रकरण : म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणातील राखीव भूखंड कर्नाटकचे मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी एन पार्वती यांना देण्यात आला आहे. 3 एकर 16 गुंठ्याचा हा भूखंड आहे. यासह म्हैसूरमधील इतर 14 साईट्स आवंटीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्या पत्नीला उच्चभ्रू वसाहतीतील भूखंड देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणी विरोधकांनी कर्नाटकचे राज्यपालांकडं तक्रार केली. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली. याविरोधात मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना उच्च न्यायालयात मोठा झटका मिळाला. राज्यपालांनी 17 ऑगस्टला मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
#WATCH | Bengaluru: Congress president Mallikarjun Kharge says, " law will take its own course... it is not necessary that the government should respond to it as it is an autonomous body, they can take action on whatever they have done is right or wrong... that is one thing...if… pic.twitter.com/7Zrdr7ZAAG
— ANI (@ANI) September 27, 2024
#WATCH | Bengaluru: On MUDA case, Karnataka CM's Financial Advisor Basvaraj Rayareddi says, " there is no need for the resignation of cm siddaramaiah... what wrong has he committed? the high court has ordered an inquiry. there is a difference between inquiry and prosecution.… pic.twitter.com/l00UXmpd5I
— ANI (@ANI) September 27, 2024
हेही वाचा :
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात होणार चौकशी, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब! - MUDA Case
- सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्यानं काँग्रेस आक्रमक, राज्यव्यापी आंदोलन करणार - Karnataka MUDA Case
- कर्नाटकचा पुन्हा असहकार ; अर्थसंकल्पात निधी न दिल्यानं नीती आयोगाच्या बैठकीवर टाकणार बहिष्कार - Karnataka To Boycott PM Meeting