गुवाहाटी (आसाम) Myanmar Border Fencing : भारत सरकार लवकरच म्यानमारच्या सीमेवर कुंपण लावून ती सीमा सुरक्षित करणार आहे. आसाममधील पोलीस कमांडोंच्या पासिंग आऊट परेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. भारत सरकार बांगलादेश प्रमाणेच म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालून ती सीमा संरक्षित करेल. तसेच सरकार म्यानमारसोबतच्या मुक्त हालचाली करारावर पुनर्विचार करत आहे. आता दोन देशांमध्ये मुक्त ये-जा करण्याची सुविधा बंद होईल.
म्यानमारच्या सीमेवर दहशतवाद्यांची समस्या : आसाम, मणिपूर आणि इतर राज्यांतील म्यानमारच्या सीमेवरील जंगलात तळ ठोकलेल्या दहशतवाद्यांची समस्या लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचं मानलं जात आहे. "मे 2021 पासून आसाम पोलिसांनी सुमारे 13,560 ड्रग्ज तस्करांना अटक केली. एनडीपीएस कायद्यांतर्गत, 8100 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत", असं अमित शाह यांनी सांगितलं.
एक लाख तरुणांना भ्रष्टाचाराशिवाय नोकऱ्या दिल्या : "आम्ही निवडणुकीदरम्यान आसाममधील एक लाख तरुणांना भ्रष्टाचाराशिवाय नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं होतं. हिमंता सरकारनं हे आश्वासन पूर्ण केलं आहे", असं शाह म्हणाले. काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, "काँग्रेस सरकारच्या काळात आसाममधील तरुणांना नोकऱ्यांसाठी पैसे मोजावे लागले. मात्र आमच्या सरकारनं नोकऱ्या दिल्या. यात कुठेही एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही. भारत संपूर्ण जगात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. 2047 मध्ये, भारत एक पूर्ण विकसित आणि स्वावलंबी राष्ट्र बनेल. त्याची सुरुवात रामलल्लाच्या भव्य मंदिरातपासून होईल. संपूर्ण ईशान्येमध्ये एक नवीन युग आणि शांतता सुरू झाली आहे", असं ते म्हणाले.
हे वाचलंत का :