ETV Bharat / bharat

मळके कपडे घातल्यानं शेतकऱ्याला मेट्रोत अडवलं : मानवाधिकार आयोगाची मेट्रो, सरकारला नोटीस - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

NHRC Seeks Report From BMRCL : बंगळुरू मेट्रोत मळके कपडे घालून आल्यामुळं शेतकऱ्याला सुरक्षा रक्षकानं प्रवेश नाकारला होता. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे.

NHRC Seeks Report From BMRCL
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 1:15 PM IST

बंगळुरू NHRC Seeks Report From BMRCL : मळके कपडे घालून मेट्रोमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मेट्रो प्रशासनानं अडवलं होतं. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (NHRC) बंगळुरू मेट्रो (BMRCL) आणि कर्नाटक सरकारला ( Karnataka Government ) नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाचा अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांवरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं ही तक्रार दाखल केली आहे.

मळके कपडे घातल्यानं अडवला शेतकरी : बंगळुरू इथल्या राजाजी नगर मेट्रो स्थानकात सोमवारी 26 फेब्रुवारीला एक शेतकरी प्रवेशासाठी आला होता. या शेतकऱ्याला मेट्रोतून प्रवास करायचा होता. मात्र या शेतकऱ्यानं अंगावर मळके कपडे घातल्यानं त्याला सुरक्षा रक्षकानं मेट्रोतून प्रवास करण्यास अडवलं होतं. केवळ अंगावर मळके कपडे घातल्यानं या शेतकऱ्याला अडवण्यात आलं. ही घटना उघकीस आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. सोशल माध्यमात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वत: या प्रकरणाची दखल घेत तक्रार दाखल केली.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल : केवळ मळके कपडे घातल्यानं शेतकऱ्याला मेट्रोतून प्रवास नाकारल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मेट्रो कॉर्पोरेशनला नोटीस बजावली आहे. मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकांनी चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिले आहेत. त्यासह राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं कर्नाटक सरकारलाही याबाबत नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा :

  1. गलिच्छ कपडे परिधान केल्याबद्दल शेतकऱ्याला बंगळुरू मेट्रोत नाकारला प्रवेश, प्रशासनानं कर्मचाऱ्यावर केली कारवाई
  2. जयललिता यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता पुन्हा चर्चेत, बंगळुरू कोर्टानं कर्नाटकला 'हे' दिले आदेश
  3. साईबाबा संस्थानला एक कोटी रुपयांची इमारत देणगी; बंगळुरूच्या महिलेनं केलं पतीचं स्वप्न पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.