ETV Bharat / bharat

निवडणूक आयोगानं काँग्रेसचे आरोप फेटाळले, बिनबुडाचे आरोप टाळण्याचं केलं आवाहन - HARYANA ASSEMBLY ELECTION 2024

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगानं मंगळवारी उत्तर दिलंय.

HARYANA ASSEMBLY ELECTION 2024
निवडणूक आयोगानं काँग्रेसचे आरोप फेटाळले (Source - ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 8:32 PM IST

हैदराबाद : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकाराचे काँग्रेसचे सर्व आरोप भारतीय निवडणूक आयोगानं (ECI) फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगानं पक्षाचे प्रत्येक आरोप निराधार, चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलंय. निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्र लिहून बिनबुडाचे आरोप टाळण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस पक्षानं 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. 'ईव्हीएम'बाबत अनेक तक्रारी माझ्याकडं आल्या असल्याचा दावाही काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता.

बिनबुडाचे आरोप करणं टाळावं : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपानं 48 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला, तर काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला होता. या निकालानंतर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगानं मंगळवारी (29 ऑक्टोबर) उत्तर दिलंय. बेजबाबदार आरोपांमुळं जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं आयोगानं म्हटलंय. काँग्रेसनं बिनबुडाचे आरोप करणं टाळावं, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. पुराव्याशिवाय निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणं टाळावं, असंही निवडणूक आयोगानं काँग्रेसला सांगितलं.

1642 पानांचं दिलं उत्तर : 26 विधानसभा जागांसाठी काँग्रेसकडून आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर 1642 पानांचं उत्तर निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलंय. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अशोक गेहलोत, जयराम रमेश, अजय माकन, भूपिंदर सिंग हुडा आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ सदस्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा

  1. मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान भीषण स्फोट; 150 हून अधिक जखमी, तर 8 गंभीर
  2. चिप्सच्या आमिषानं नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार : नागरिकांनी दरवाजा तोडून केली पीडितेची सुटका
  3. तेजस्वी सूर्या ठरले आयर्नमॅन; पार केली खडतर स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'असं' केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.