ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार, 4 ऑक्टोबरला लागणार निकाल - Assembly Election 2024 Schedule - ASSEMBLY ELECTION 2024 SCHEDULE

Election Commission Press Conference : आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आज निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. निवडणूक आयोग आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Election Commission Press Conference
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 9:02 AM IST

Updated : Aug 16, 2024, 3:32 PM IST

नवी दिल्ली Election Commission Press Conference : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आज बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची तारीख जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात कधी निवडणुका होणार याची उत्सुकता राजकीय पक्षांना लागली आहे. राज्यात लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत होती.

Live updates

दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे.

  • जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहेत. मतदान हे 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
  • बॅलेट की बुलेट यावर जम्मू काश्मीरमधील जनतेने मतदानाचा पर्याय निवडला.
  • मागील निवडणुकीत काश्मीर स्थलांतरितांसाठीदेखील सोय करण्यात आली होती.
  • जम्मू काश्मीरमध्ये जनतेनं निवडणुकीत मोठा रस दाखविला.
  • एकूण ८७.०९ लाख मतदार आहेत.
  • २०.७ लाख युवा मतदार आहेत.
  • ३.७१ लाख हे प्रथम मतदान करणार आहेत.
  • ४२.६२ हे महिला मतदार आहेत
  • १६९ तृतीयपंथीय मतदार आहेत.
  • ७३,९४३ हे मतदार ८५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत.

आयोगानं घेतला तयारीचा आढावा : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जम्मू- काश्मीर आणि हरियाणामध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक आयोग आज या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी? : येत्या सहा महिन्यांत हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये आणि झारखंडचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये संपत आहे. तसंच जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. यापूर्वी म्हणजे 2019 मध्ये निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या. झारखंडमध्ये स्वतंत्र निवडणुका झाल्या होत्या. मात्र, यावेळी निवडणूक आयोग आधी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा आणि नंतर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्रात कधी? : केंद्रीय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये दौरा केला होता. या दौऱयावेळी त्यांनी तेथील निवडणुक तयारीचा आढावा घेतला होता. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त एस एस संधू हे निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी 8 आणि 9 ऑगस्टला जम्मू- काश्मीरमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यानंतर १२ आणि १३ ऑगस्टला हरियाण येथे जात तयारीचा आढावा घेतला. मात्र, हे पथक महाराष्ट्रात अजून तरी आलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा आज होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींची कमाई झाल्यानं काँग्रेसला 'अच्छे दिन' - Assembly Election 2024
  2. दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडी सोपविणार मोठी जबाबदारी? काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा - Assembly Election 2024
  3. 'बारामतीत मला रस नाही'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धक्कादायक माहिती, विधानसभेबाबत सूचक विधान - Ajit Pawar On Assembly Election

Last Updated : Aug 16, 2024, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.