ETV Bharat / bharat

सपा आमदार इरफान सोलंकीच्या घरावर ईडीची छापेमारी; मुंबईत अलिशान घर असल्याचं उघड - ED Raid On SP MLA Irfan Solanki

ED Raid On SP MLA Irfan Solanki : समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या घरावर ईडीनं गुरुवारी सकाळी छापेमारी केली. या छाप्यात आमदार इरफान सोलंकी यांच्या घरातून संपत्तीची अनेक कागदपत्र आणि डायरी जप्त करण्यात आली आहेत.

ED Raid On SP MLA Irfan Solanki
आमदार इरफान सोलंकीच्या घरावर ईडीची छापेमारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 10:10 AM IST

कानपूर ED Raid On SP MLA Irfan Solanki : समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या घरावर ईडीच्या पथकानं गुरुवारी सकाळी छापेमारी केली. इरफान सोलंकी यांच्या घरावर टाकलेली ही छापेमारी तब्बल 10 तासापेक्षांही जास्त सुरू होती. या छाप्यात ईडीच्या पथकाला 40 ते 50 कोटी रुपयांच्या मालमत्तेची माहिती मिळाली. त्यासह त्यांचं मुंबईत 5 कोटी रुपयांचं घर असल्याचंही या छापेमारीतून उघड झालं. यावेळी इरफान सोलंकींच्या घरातून 26 लाखांची रोखही सापडली आहे.

ED Raid On MLA Irfan Solanki House
आमदार इरफान सोलंकीच्या घरावर ईडीची छापेमारी

आर्थिक व्यवहाराची कागदपत्रं केली जप्त : ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत समाजवादी आमदार इरफान सोलंकी यांच्या घरात डायरी आणि कागदपत्रं आढळून आली आहेत. ही कागदपत्रं ईडीच्या पथकानं सोबत नेली आहेत. आमदार इरफान सोलंकी यांच्या घरात आर्थिक व्यवहाराच्या पावत्या ईडी अधिकाऱ्यांना आढळून आल्या आहेत. आमदार इरफान सोलंकी यांचा भाऊ रिझवान सोलंकी याच्याशी संभंधित सर्व कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत पाच कोटीचं घर असल्याचं उघड : ईडीच्या अधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. इरफान सोलंकी यांचं मुंबईत पाच कोटी रुपयांचं अलिशान घर असल्याचं या छापेमारीत उघड झालं. त्यामुळं ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. इरफान सोलंकी यांचं कानपूरमधील घरही 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं असल्याचं बोललं जात आहे.

ईडी अधिकाऱ्यांकडं होती आमदार इरफान सोलंकींची कुंडली : ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत अनेक संपत्तीची कागदपत्रं सापडली आहे. ईडी अधिकाऱ्यांकडं आमदार इरफान सोलंकी यांची सगळी कुंडली होती, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. आमदार इरफान सोलंकी यांनी कुठं गुंतवणूक केली, आमदारावर किती गुन्हे आहेत, आमदार इरफान सोलंकी यांच्या काळ्या पैशाचा आधार काय, आदी सगळ्या मुद्द्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडं इत्यंभूत माहिती होती. ईडीच्या पथकानं आमदार इरफान सोलंकी यांच्यासह त्याचा भाऊ रिजवान सोलंकी, रिअल इस्टेट पार्टनर बिल्डर शौकत अली आणि हाजी वासी यांच्या घरांवरही छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. ईडीची मोठी कारवाई, 'आप'च्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी
  2. रवींद्र वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी, राजकारण तापण्याची चिन्हे
  3. दिल्ली दारू घोटाळा : अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडी छापेमारीची आप नेत्यांनी वर्तवली शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.