ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवालांपाठोपाठ के कवितांचाही पाय खोलात; दोघेही ईडी कोठडीत - Delhi Liquor Policy Scam Case - DELHI LIQUOR POLICY SCAM CASE

K Kavita ED Custody : तेलंगाणातील बीआरएस नेत्या के. कविता यांच्या ईडी कोठडीत 26 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 5:23 PM IST

नवी दिल्ली K Kavita ED Custody : दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या BRS नेत्या के. कविता यांना शनिवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीनं न्यायालयात के कविता यांना आणखी पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयानं के. कविता यांच्या कोठडीत 26 मार्चपर्यंत वाढ केलीय. त्यामुळं के कविता यांना आता 4 दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. दरम्यान, एक्साईज पॉलिसी मनी लाँडरिंग प्रकरणात के. कविता यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय.

के. कविता यांनी मोबाईल डेटा डिलीट केला : के.कविता यांनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केलाय. त्यांच्या मोबाईल डेटाचंही विश्लेषण करण्यात आलं. मात्र, ईडीच्या तपासादरम्यान त्यांनी मोबाईल डेटा डिलीट केल्याचं निष्पन्न झालं. तसंच, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही तपशील दिलेला नाही, असा युक्तिवाद ईडीचे विशेष वकील जोहेब हुसेन यांनी केला.

हैदराबाद येथील निवासस्थानाची झडती : शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीचे वकील जोहेब हुसेन यांनी के. कविताच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. के. कविता यांची दिल्ली दारू घोटाळ्यात भूमिका काय होती हे जाणून घ्याचंय. त्यांनी या प्रकरणात 100 कोटींची लाच देण्याचा कट रचला होता. के. कविताचे जवळचे नातेवाईक, त्यांचा पुतण्या समीर महेंद्रू यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाची झडती घेण्यात येत असल्याचंही ईडीनं न्यायालयाला सांगितलं.

कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्याची परवानगी : के. कविता यांची बाजू मांडणारे वकील नितेश राणा यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, या प्रकरणात ईडीला नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र, जोहेब हुसैन यांनी ईडीला नोटीस बजावण्यास विरोध केला. दरम्यान. के. कविता यांच्या वकिलांनी त्यांच्या (के कविता) मुलांना भेटण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. न्यायालयानं के. कविता यांना त्यांच्या दोन मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना कोर्टरूममध्ये भेटण्याची परवानगी दिली.

हे वाचलंत का :

  1. "केजरीवाल जेलमध्ये गेले आणि संजय राऊत...", केजरीवालांचं उदाहरण देत किरीट सोमैयांचा राऊतांवर निशाणा - Kirit Somaiya News
  2. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीकरांना खास संदेश; म्हणाले... - Cm Kejriwal Message to Delhi People
  3. "जर अरविंद केजरीवाल यांनी 24 तासांत राजीनामा दिला नाही तर...", घटनातज्ञांचं मत काय? - Constitutional Experts Opinion

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.