ETV Bharat / bharat

नदीत हिरे शोधण्याकरिता नागरिकांची येथे उडते झुंबड, सत्य काय आहे? - Panna Diamond River Runjh - PANNA DIAMOND RIVER RUNJH

Panna Diamond River Runjh : हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात अनेकांना हिरे सापडतील अशी आशा असते. अजयगढ तालुक्यातील आरामगंज गावातून रुंज नदीत वाहते. या नदीत चक्क हिरे सापडतात, अशी अनेकांची समजूत आहे. मात्र, अनेकजण सकाळपासूनच हिऱ्यांचा शोध घेतात. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

Runj river
रुंज नदी (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 7:13 PM IST

पन्ना Panna Diamond River Runjh : हिऱ्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्नामध्ये रुंज नदी वाहते. या नदीत हिरे सापडत असल्याची अफवा आहे. डोंगराळ भागातून मैदानी प्रदेशात वाहणारी रुंज नदी वाहते. आजूबाजूचे लोक नेहमी या हिऱ्यांच्या शोधात असतात. स्थानिक लोक सकाळपासूनच हिऱ्यांचा शोध सुरू करतात. हा मौल्यवान धातू शोधण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे सातत्यानं सुरू आहे. मात्र काहीच्या हाती काहीच न लागल्यानं त्यांच्यात निराशा पसरली आहे.

रुंज नदी हिरे शोधताना नागरिक (ETV BHARAT NATIONAL Desk)

केवळ भाग्यवानांनाच मिळतात मौल्यवान हिरे? : पन्ना जिल्ह्यातील अजयगड तहसीलच्या आरामगंज गावातून जाणारी रुंज नदी वाहते. शेकडो लोक नदीच्या दोन्ही काठावर हिरे शोधतात. या दुर्मिळ धातूचा शोध घेणारे पहाटेच नदीवर येतात. दिवसभर नदीत हिऱ्यांचा शोध घेतला जातो. जे भाग्यवान असतात त्यांनाच हिरे मिळतात असा, स्थानिकांचा दावा आहे. मात्र, अनेकांना दिवसभर बसूनही रिकाम्या हातानं घरी परतावं लागतं. नदीत हिरे सापडतात, ही अफवा असल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे. रुंज नदी पन्नाच्या डोंगराळ भागातून उगम पावते. डोंगरातून वाहत ती आरामगंजच्या मैदानी प्रदेशात पोहोचते. येथे स्थानिक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी रोज येतात. हा मौल्यवान धातू सापडण्यासाठी काही महिने तसंच वर्ष लागू शकतं, असं सांगितलं जातं.

एखाद्यालाच सापडतो हिरा : ईटीव्ही भारतच्या टीमनं घटनास्थळी जाऊन हिऱ्यांचा शोध घेणाऱ्या लोकांशी संवाद साधलाय. यावेळी ते म्हणाले, 'आम्ही नशीब आजमावण्यासाठी हिऱ्यांच्या शोधात आलो आहोत. ज्याचं नशीब असतं, त्यांना हिरा मिळतो. बाकीचे रिकाम्या हातानं घरी जातात. हे अधूनमधून घडतं, जेव्हा एखाद्याला हा मौल्यवान धातू सापडतो. अन्यथा रोज सकाळ संध्याकाळपर्यंत हिरे शोधून लोक रिकाम्या हातानं घरी परततात."

असा शोधतात नदीत हिरा : "हा धातू जितका मौल्यवान आहे, तितकाच तो शोधणंही अवघड आहे. फावडे, जाळीदार टोपले घेऊन लोक हिऱ्यांच्या शोधात नदीपर्यंत पोहोचतात. नदीच्या उतरणीच्या भागांव्यतिरिक्त, हिरे नदीच्या दोन्ही काठावर शोधले जातात. नदीत वाहून आलेली माती टोपल्यात भरली जाते. त्यानंतर मातीला चाळून हिऱ्याचा शोध घेतला जातो. तसंच काही नागरिक नदीच्या काठावरचं दगड काढून तिथंही हिऱ्यांचा शोध घेतात. प्रत्येकजण आपल्या हिरा मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेतो. परंतु सर्वात भाग्यवान लोकांनाच असा खजिना मिळतो, असा स्थानिकांचा दावा आहे.

कधी संपणार हिऱ्यांचा शोध : सुमारे 2 वर्षांपूर्वी रुंज नदीत सुमारे 72 कॅरेटचा हिरा सापडल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यानंतर येथे लोकांची गर्दी वाढली आहे. त्यादरम्यान जवळपास 15 ते 20 हजार लोक हिऱ्यांच्या शोधात येऊ लागले. स्थानिक प्रशासनानं यावर कारवाई करत लोकांची ये-जा थांबवली. कारण नदीचा हा भाग पन्ना वन परिक्षेत्रांतर्गत विश्रामगंज रेंजमध्ये येतो. वन्यप्राण्यांची संवेदनशीलता लक्षात घेऊन गर्दी रोखण्यात आलीय. या नदीवर रुंज धरण बांधण्यात येत आहेत. त्याचं काम वेगानं सुरू आहे. धरणाचं जवळपास 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. धरणाचं बांधकाम लवकरच पूर्ण होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. धरण बांधल्यानंतर नदीचा हा परिसर पाण्यात जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.