नवी दिल्ली Arvind Kejriwal Arrest By CBI : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणात सीबीआय अॅक्शन मोडवर आली आहे. सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांची कारागृहात चौकशी केली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आज राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सीबीआयनं त्यांना तिहार तुरुंगात नेलं आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग प्रकरणी मंगळवारी त्यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांचा जबाब नोंदवला. मात्र यात अरंविद केजरीवाल यांच्या उत्तरात तफावत आढळल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना आज सकाळी अटक केली.
BIG EXPOSE ‼️
— Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) June 25, 2024
BJP की केंद्र सरकार और CBI की @ArvindKejriwal जी के ख़िलाफ़ बड़ी साज़िश 🚨
अरविंद केजरीवाल जी को सुप्रीम कोर्ट से जमानत मिलने की पूरी संभावना है। इससे पहले केंद्र की BJP सरकार ने CBI के साथ मिलकर केजरीवाल जी के ख़िलाफ़ झूठा मुक़दमा तैयार करके उन्हें गिरफ़्तार… pic.twitter.com/8JhOsZZApt
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक : दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप करत ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आता सीबीआयही अॅक्शन मोडवर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, तपास यंत्रणेनं अरविंद केजरीवाल यांची केवळ चौकशी केली. त्यानंतर सीबीआय अधिकारी तिहारहून परत आल्याचं नंतर उघड झालं. सीबीआय आणि ईडीनं ऑगस्ट 2022 मध्ये दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील कथित अनियमिततेबद्दल गुन्हे दाखल केले. दारू धोरण प्रकरणी ईडीनं 21 मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली. 1 एप्रिल रोजी त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. आता आज सकाळी सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली.
Delhi Excise Case: CBI examines Arvind Kejriwal in Tihar, gets permission for his production before court today, may arrest also
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2024
Read @ANI Story | https://t.co/YPjbuv77oY#ArvindKejriwal #CBI #DelhiExcisePolicyCase pic.twitter.com/cB83ZkKtNP
अरविंद केजरीवालांवर कथित 100 कोटींची लाच घेतल्याचा आरोप : दिल्ली दारू घोटाळ्यात धोरण ठरवताना 100 कोटी रुपयाची कथित लाच घेतल्याचा आरोप सीबीआयनं केला. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आम आदमी पक्षानं 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याच्या पैशाचा वापर केल्याचा दावाही तपास यंत्रणांनी केला. आम आदमी पक्षानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :
- Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू
- केजरीवाल राहणार तुरुंगातच, दिल्ली उच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार - Arvind Kejriwal Bail Plea
- "देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering