ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवालांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला! म्हणाले, 2029 ला देश 'भाजपा'मुक्त करणार - दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal in Delhi Assembly : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत पुन्हा एकदा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी केजरीवाल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला होता. 'आप'कडे एकूण 70 पैकी 62 आमदार आहेत.

दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 5:47 PM IST

नवी दिल्ली : Arvind Kejriwal in Delhi Assembly : विश्वासदर्शक ठराव एकमतानं मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल यांनी त्यांचा पक्ष आम आदमी पार्टी भाजपसाठी सर्वात मोठा अडसर आहे. म्हणूनच आमच्यावर सगळीकडून हल्ले होत असल्याचा घणाघात केला.

आप देशाला भाजप मुक्त करेल : दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान केजरीवाल म्हणाले की, येत्या निवडणुकीत भाजपाला दिल्ली विधानसभा रद्द करायची आहे. जर भाजपानं विधानसभा रद्द केली तर मी दिल्लीच्या मतदारांसाठी काम करत राहील. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार दिल्ली विधानसभा रद्द करेल, असा आरोपही केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे. तसंच, भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी, 2029 च्या निवडणुकीत आप देशाला भाजपा मुक्त करेल, असा विश्वास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष : "भाजपाला भविष्याची भीती वाटत असेल तर ती आपमुळेच वाटत आहे. त्यामुळेच त्यांना आम आदमी पार्टी फोडायची आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा हरला नाही तर, आम आदमी पक्ष 2029 पर्यंत देशाला भाजपामुक्त करेल, हे नक्की" असंही केजरीवाल म्हणालेत. 'आप'ची स्थापना 12 वर्षांपूर्वी झाली. देशात सुमारे 1,350 पक्ष आहेत. AAP ने 26 नोव्हेंबर 2012 रोजी नोंदणीसाठी अर्ज केला होता. आता तो भाजप आणि काँग्रेसनंतर देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असाही दावा केजरीवाल यांनी केला.

विश्वासदर्शक ठराव जिंकला : सभागृहाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. मतदानादरम्यान 62 पैकी 54 आप आमदार उपस्थित होते. 'आप'ने बहुमत मिळवलं. आपला 54 मते मिळाली. प्रत्यक्षात एक मत विरोधात पडले. सेवा विभाग आणि नोकरशाहीवर नियंत्रण ठेवून भाजपा आपल्या सरकारच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. यापूर्वी विश्वासदर्शक प्रस्ताव ऑगस्ट 2022 आणि मार्च 2023 मध्ये आला होता. आपनं आरोप केला होता की, भाजपा त्यांचे आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवत आहे. दिल्लीच्या 70 सदस्यांच्या सभागृहात 62 आमदारांसह दिल्ली विधानसभेत 'आप'कडं मोठं बहुमत आहे. विरोधी पक्ष भाजपाचे आठ आमदार असून त्यापैकी सात सध्या निलंबित आहेत.

हेही वाचा :

1 'ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला, देशात कधी असं घडलं नाही'; शरद पवार

2 काँग्रेसचा आणखी एक मुख्यमंत्री भाजपाच्या वाटेवर? कमलनाथ समर्थकांसह मोठा निर्णय घेणार

3 अल्पवयीन मुलींना धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला 48 तासात केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.