ETV Bharat / bharat

"संविधान सुरक्षा कवच, सत्ताधाऱ्यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला": प्रियंका गांधींचा संसदेतील पहिल्याच भाषणात घणाघात - CONSTITUTION IS SURAKSHA KAVACH

सत्ताधारी भाजपाने संविधान बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केला असल्याची टीका आपल्या पहिल्याच भाषणात प्रियंका गांधी यांनी केलीय.

प्रियंका गांधींचा संसदेतील पहिल्याच भाषणात घणाघात
प्रियंका गांधींचा संसदेतील पहिल्याच भाषणात घणाघात (सौ - संसद टीव्ही)
author img

By ANI

Published : 3 hours ago

नवी दिल्ली : संविधानाला 'सुरक्षा कवच' म्हणत, काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात सत्ताधारी सरकारवर हल्ला चढवला. गेल्या 10 वर्षांपासून केंद्र सरकारनं 'कवच' (ढाल) तोडण्याचे सर्व प्रयत्न केले आहेत असं त्या म्हणाल्या.

भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना प्रियंका गांधी यांनी 2001 मध्ये संसदेचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. "कोट्यवधी भारतीयांच्या संघर्षात, कठीण परिस्थितीशी लढण्याच्या बळावर आणि देशाकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने, आपल्या संविधानाची ज्योत तेवत आहे. आपली राज्यघटना म्हणजे 'सुरक्षा कवच' आहे. 'सुरक्षा कवच' जे नागरिकांना सुरक्षित ठेवते - ते न्यायाचे, ऐक्याचे, अभिव्यक्तीच्या अधिकाराचे 'कवच' आहे. मात्र 10 वर्षे सत्ताधारी पक्षाच्या सहकाऱ्यांनी हे 'कवच' मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. खाजगीकरण करुन, हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे,” असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांनी लोकसभेत जात जनगणनेबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. "जातीची जनगणना ही काळाची गरज आहे, तरीही ते मंगळसूत्रांवर चर्चा करून त्याचे तुच्छीकरण करतात. आज देशातील जनता जात जनगणना व्हावी, अशी मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतील या निकालांमुळेच जात जनगणना आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येकाची स्थिती जाणून घेता येईल.

वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, "दिवंगत पंतप्रधान नेहरू ज्यांचे नाव घेताना तुम्ही कधी कधी संकोच करता, इतर वेळी स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांचा वापर करत. पण त्यांनी HAL, BHEL, SAIL, GAIL, ONGC, NTPC, रेल्वे, IIT, आयआयएम, ऑइल रिफायनरीज आणि अनेक पीएसयू त्यांनी निर्माण केल्या. त्या तुम्ही विकू शकता मात्र, त्याचा इतिहास पुस्तकांमधून पुसला जाऊ शकत नाही. तसंच स्वातंत्र्य संग्रामातील त्यांची भूमिका, हे राष्ट्र घडवताना त्यांनी केलेली कामगिरी कधीही पुसली जाऊ शकत नाही."

प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर एका व्यक्तीची (अदानी) बाजू घेत असल्याची टीका केली. "एका व्यक्तीसाठी सर्व काही बदलले जात आहे. आजच्या सरकारने अदानींना सर्व कोल्ड स्टोरेज दिले आहेत. हिमाचलमधील सफरचंद उत्पादक रडकुंडीला आले आहेत. कारण एका व्यक्तीसाठी सर्व काही बदलले जात आहे. एका व्यक्तीची मर्जी राखली जात आहे आणि 142 कोटी भारतीयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे, विमानतळ इत्यादींसह सर्व व्यवसाय एका व्यक्तीला दिले जात आहेत.” असं त्या म्हणाल्या.

"मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या आणि सत्य समोर येईल." असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं. तिने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला आणि "सरकार लॅटरल एंट्री, खासगीकरणाद्वारे आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे." असं त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी संभल हिंसाचार पीडितांच्या भेटीचा उल्लेख केला आणि सांगितलं की, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे असं त्यांचं स्वप्न होतं. "संभलच्या शोकग्रस्त कुटुंबातील काही लोक आम्हाला भेटायला आले होते. त्यांच्यामध्ये अदनान आणि उझैर अशी दोन मुले होती. त्यापैकी एक माझ्या मुलाच्या वयाचा आणि दुसरा 17 वर्षांचा लहान होता. त्यांचे वडील टेलर होते. त्याचे फक्त एक स्वप्न होते - तो आपल्या मुलांना शिक्षण देईल, एक मुलगा डॉक्टर बनेल आणि दुसरा यशस्वी होईल. पोलिसांनी त्यांच्या वडिलांना गोळ्या घालून ठार केलं अदनानने मला सांगितलं की तो मोठा होऊन त्याच्या वडिलांचं स्वप्न साकार करेल," असे प्रियंगा गांधी यांनी सांगितलं.

हेही वाचा...

  1. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.